कोपरगांव / प्रतिनिधी:
तालुक्यातील धामोरी हे गाव तालुक्यात दोन नंबरच्या स्थानावर असुन गावागावातील लोकसंख्याही भरपूर प्रमाणात आहे.सर्व सोयीसुविधेचे व्यवसाय देखील आहेत.परंतु दिवाळी सण आठ दहा दिवसांवर येवून ठेपला असताना देखील धामोरी गावातील व्यावसायिकांवर ग्राहकमंदीचे सावट स्पष्ट दिसून येते आहे.
सध्या गावातील किराणा दुकान,जनरल स्टोअर, हार्डवेअर, इलेट्रिकल्स,स्विट फरसाण,सलुन मोबाईल आदि दुकानदार या व्यवसायांच्या दुकानांवर सध्या ग्राहकांची मंदी दिसुन येत असल्याने आमचे धामोरी प्रतिनिधी दत्तात्रय घुले यांनी व्यावसायिकांकडून ग्राहक मंदीच्या बाबतीत अधिक जाणून घेतले असता सदरील व्यावसायिकांकडून सांगण्यात आले की,सध्याची वाढलेली महागाई त्यावर मजुरांच्या हाताला काम नाही आणि सध्या अवकाळी पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला असल्याने बाजारपेठ ग्राहकमंदीचे सावट असल्याचे निदर्शनास आले.
अशा या परिस्थितीमुळे व्यावसायिकांवर ग्राहकमंदी असल्याने सदरील छायाचित्रातुन स्पष्ट दिसुन येत आहे.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दत्तात्रय घुले - धामोरी
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११