विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या मान्यवरांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान
श्रीरामपूर / प्रतिनिधी
सजग पत्रकारितेचा अमीट ठसा उमटवणाऱ्या शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा चा १६ वा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ चा भव्य सोहळा अत्यंत प्रेरणादायी व ऐतिहासिक स्वरूपात अहिल्यानगर येथील हॉटेल संजोग च्या प्रशस्त ए.सी. हॉल मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे नेतृत्व संपादक मा.रमेश जेठे (सर) यांनी कुशलतेने केले. सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मान्यवर, साहित्यिक, समाजसेवक, पत्रकार, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
मुख्य आकर्षण होते आदर्श गांव हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रेरणादायी उपस्थिती. त्यांच्यासह मान्यवरांमध्ये दैनिक जयबाबा चे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे, डॉ. बबन जोगदंड, टी.एस. चव्हाण, नगरसेवक नितीन वाघमारे, रवि शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात २९ समाजहितैषी मान्यवरांना “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” ने गौरवण्यात आले. या मान्यवरांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून ते समाजासाठी दीपस्तंभ ठरले आहेत त्यात सर्वश्री भरत विटकर, सदाशिव जाधव, कर्नल ऋषिकेश धोत्रे, राजेश ननवरे, कीर्ती पवार, संदीप कुसळकर, भोरू मस्के, शाम विटकरी, सुरेश विटकर, चंद्रकांत शहासने, ललित गुंदेचा, धर्मात्मा मिश्रीमल मुथ्था, रवि शिंदे,अप्पासाहेब ढूस, राजकुमार आघाव, रामचंद्र मंजुळे, विष्णू पवार, कृष्णा पवार, सचिन शिंदे, राजू ननवरे, दीपक मेढे, किरण तागडकर, सागर धनवटे, मोहन गायकवाड, नितीन शेलार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीवेतेसाठी समता फाऊंडेशन चे संस्थापक / अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, शिवाजी ननवरे, विशाल जेठे, हरिष बंडीवडार, मयूर मिरे, बबलू विटेकर,डॉ. सुहास पाखरे, निरज जेठे व शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सोहळ्याचे आयोजन हुबेहूब सिनेमासोहळ्याच्या तोडीचे ठरले. अहिल्यानगरच्या धर्तीवर असा भव्य सोहळा प्रथमच पार पडला.
सामाजिक एकतेचा, प्रेरणेचा आणि योगदानाचा उज्ज्वल दीप म्हणून शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा ही जनतेच्या मनात अधिक खोलवर अधोरेखित झाली.अलंकार हा वृत्तपत्राला असतो त्याच्या सत्यवचन, निर्भीडतेच्या तेजात...” याची प्रचिती या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्यक्षात बघावयास मिळाली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणी सिने क्षेत्रास लाजवेल असे सुयोग्य सुत्र संचालन सुप्रसिद्ध निवेदक उध्दव काळापहाड व प्रियांका मॅडम यांनी केले.शेवटी संपादक रमेश जेठे (सर) यांनी आभार मानले.
कार्यक्रमास औसा (जि.लातूर) विधानसभेचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांच्या शुभेच्छा
औसा (जि.लातूर) विधानसभेचे लोकप्रिय सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब हे शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवेच्या १६ व्या राज्यस्तरीय वर्धापन दिन व “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” या भव्य सोहळ्याचे उद्घाटक म्हणून सन्मानित उपस्थित राहणार होते. परंतु, पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यामुळे कार्यक्रमास त्यांना प्रत्यक्ष हजेरी लावणे शक्य झाले नाही, ही खंत सर्वांना होती.
तथापि, त्यांनी आपला आत्मीय संवाद आणि सदिच्छा प्रतिनिधीच्या माध्यमातून पोहोचवताना, शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवेला शुभेच्छा पत्र पाठवले. त्या पत्रात त्यांनी संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढत, भविष्यातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
त्यांचा हा सद्भावपूर्ण संदेश केवळ औपचारिक शुभेच्छा नव्हता, तर त्यातून त्यांच्या मनातील आपुलकी, संस्थेप्रती आदरभाव आणि सामाजिक कार्याच्या मूल्यांना दिलेली मान्यता प्रकट झाली.
त्यांचे हे शुभेच्छा पत्र मंचावरील वातावरणात जणू एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे ठरले. उपस्थित मान्यवरांनी आणि श्रोतृवर्गानेही याचा मनापासून आनंद घेतला. त्यामुळे कार्यक्रमास एक वेगळेच गौरवाचे आणि प्रेरणादायी परिमाण लाभले.
या विशेष उल्लेखामुळे संपूर्ण सोहळ्याला एक सज्जन, सुसंस्कृत आणि सन्माननीय दरजा प्राप्त झाला, हे निश्चितच उल्लेखनीय ठरते,
वृत्त विशेष सहयोग
विशाल व निरज जेठे (देहरे)
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 956117411