*१०० दिवसांत वचनपूर्ती; अन्यथा राजीनामा —
प्रभाग १(ब) मधील उमेदवार हसीना हनीफ शेख यांची नोटरीद्वारे घोषणा*
"अजहर हनीफ शेख यांच्या लोकप्रिय कार्यशैलीवर चाललेली मोहीम;
नोटरीत सर्व वचने लेखी, १० पेक्षा अधिक नागरिकांची स्वाक्षरी"
श्रीरामपूर : प्रभाग क्र. 1(ब) मधील निवडणुकीत पारदर्शकतेचा नवा इतिहास घडवत नगरसेवक पदाच्या उमेदवार हसीना हनीफ शेख यांनी न्यायालयीन नोटरीद्वारे १०० दिवसांत वचनपूर्तीची घोषणा केली आहे. हसीना हनीफ शेख या प्रभागातील लोकप्रिय समाजसेवक अजहर हनीफ शेख यांच्या माता असून, अजहर शेख यांनी मागील अनेक वर्षांपासून प्रभागात विविध योजना आणून, नागरिकांच्या समस्या सोडवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे त्यांची लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे.
यंदा प्रभागात महिला आरक्षण लागू झाल्याने, जनतेची सुरू ठेवलेली सेवा अधिक परिणामकारकपणे पुढे न्यायावी म्हणून अजहर हनीफ शेख यांनी आपल्या मातेला उमेदवारीसाठी पुढे केले आहे. ही निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पारदर्शक वचनबद्धतेमुळे विशेष चर्चेत आली आहे.
*नोटरीद्वारे कायदेशीर जाहीरनामा*
नोटरीमध्ये हसीना हनीफ शेख यांनी स्पष्ट नमूद केले आहे की,
“निवडून आले, तर प्रभागात दिलेली सर्व कामे आणि आवश्यक सुविधा १०० दिवसांच्या आत सुरू करतील. नाहीतर नगरसेवकपदाचा राजीनामा देतील.”
या नोटरीवर प्रभागातील १० पेक्षा अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला पाठिंबा दर्शवला आहे.
घोषणापत्र – प्रभागासाठी जाहीर केलेल्या सुविधा
• २४ तास मोफत ऍम्ब्युलन्स सेवा
• मोफत रक्त लागावी तपासणी संकलन केंद्र
• प्रभागात अर्ध्या किमतीत औषधालय
• ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत योगा क्लासेस
• विद्यार्थ्यांसाठी वाचनालय
• प्रभागातील नागरिक व विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रयोगशाळा
• विद्यार्थ्यांसाठी व जनतेसाठी मोफत सेतू कार्यालय
• माता-भगिनींसाठी हुनर हब
• शिकायत/सूचना पेटिका (Complaint/Suggestion Box)
• युवकांसाठी व्यायामशाळा (Gym)
• सिनिअर सिटीझनसाठी क्लीन सिटी एरिया व पेपर स्टँड
• प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे
• माता-भगिनींसाठी स्वतंत्र तक्रार पेटी
*अजहर हनीफ शेख यांचे जनतेसमोरील निवेदन*
“मी आपणास माझ्या सामाजिक कार्याचा पुरावा दिला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला आपली सेवा करण्याची एक संधी द्यावी. मी जी कामे जाहीर केली आहेत ती सर्व कामे मी नगरसेवक झाल्यानंतरच्या पहिल्या १०० दिवसांत पूर्ण करून दाखवीन. नाही तर मी जनतेला साक्षी ठेवून, त्यांच्या उपस्थितीत नोटरी करून देत आहे.
मी राजकारणी नाही—मी समाजसेवक आहे. जर १०० दिवसांत ही सर्व कामे पूर्ण केली नाहीत तर मी नगरसेवकपदाचा राजीनामा देईन. मी हे सर्व लेखी स्वरूपात साक्षीदारांसमोर देत आहे, कारण मला खऱ्या अर्थाने समाजसेवा करायची आहे. माझे ध्येय सत्ता नाही तर परिवर्तन आहे. मला सत्तेपेक्षा जनजागृती महत्त्वाची वाटते.
मी खोटे बोलत नाही. मी जे जाहीर केले आहे त्यासाठी मी प्रभागातील जनतेसोबत नोटरी करत आहोत आणि त्या नोटरीची झेरॉक्स प्रत आपणास देत आहोत. जर मी कामे केली नाहीत, तर मी राजीनामा देईल हे मी लेखी देत आहे.”
*नागरिकांचा उदंड प्रतिसाद*
प्रथमच एखाद्या उमेदवाराने अशा प्रकारे कायदेशीर जबाबदारी स्वीकारत नोटरी सादर केल्याने नागरिकांनी यास ऐतिहासिक पाऊल म्हणत स्वागत केले आहे. ही पद्धत प्रभागातील राजकीय संस्कृती अधिक पारदर्शक करण्याचा आदर्श मानली जात आहे.
*निवडणूक वातावरणात उत्सुकता*
अजहर हनीफ शेख यांच्या लोकप्रियतेची जोड आणि हसीना हनीफ शेख यांची स्पष्ट वचनबद्धता या दोन्हीमुळे प्रभाग 1(ब) मधील निवडणूक अधिकच चुरशीची बनली असून इतर उमेदवारांसाठीही हे नवे मापदंड ठरत आहेत.








