श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील शिक्षण क्षेत्रात नावाजलेली अलमीजान उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक इकबाल इस्माईल काकर यांना नुकताच शिक्षक दिनानिमित्त ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान तालुका श्रीरामपूर यांच्यावतीने शैक्षणिक व सामाजिक कार्य गौरव या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ लखनऊ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य डॉ.के.एच. शिंदे होते. याप्रसंगी ज्ञानज्योती संस्थेच्या वतीने १०१ अनाथ निराधार मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमागदार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिनी, शिक्षक, शिक्षिका व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.तसेच निराधार बालके, पालक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शासकीय सेवा, आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक , शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, धार्मिक, महिला सक्षमीकरण, कृषी, आदर्श सरपंच, उपसरपंच, स्वच्छ व सुंदर शाळा अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र (तात्या) फडके कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. के.एस. शिंदे, माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे,पत्रकार करण नवले, ज्ञान ज्योति बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,निसर्ग व पर्यावरण मंडळाचे राज्य संघटक डॉ. प्राध्यापक आणि लोखंडे सेवा संस्थेचे चेअरमन मंजाबापू थोरात, ह.भ.प. दत्तात्रय बहिरट महाराज, श्रीरामपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजीवन दिवे, ज्येष्ठ ग्रामीण कवी पोपटराव पठारे, आरोग्य मित्र सुभाषराव गायकवाड, वात्सल्य मिशन समितीचे बाळासाहेब श्री.जपे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे , प्राचार्य जयकर मगर ,श्रीधर गाडे, विद्रोही सामाजिक चळवळीचे अध्यक्ष तथा बैतुश्शिफा हॉस्पिटलचे डॉ. सलीम शेख, बसपा चे कांबळे सर, शिक्षक संघटनेचे नेते सतीश जाधव, शमशेर खान पठाण , केंद्रप्रमुख राजू इनामदार, केंद्रप्रमुख पिलगर सर, जुनेद जमील काकर , दानियल काकर ,राजूभाई शेख, शिक्षक नेते नाना, इंजि.श्री. बडाख, राऊत सर आदि मान्यवर उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111