पत्रकारांचा खरा तारणहार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा आधारस्तंभ मा. वसंतराव मुंडे माऊली - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

22 October 2024

पत्रकारांचा खरा तारणहार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा आधारस्तंभ मा. वसंतराव मुंडे माऊली

 


बीड / प्रतिनिधी:

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील “पत्रकार” या दुर्लक्षित घटकाला न्याय देण्यासाठी आपण अविरत प्रयत्न केला. “पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ” हा आपणासोबतच महाराष्ट्रातील सर्वच पत्रकारांचा सन्मान आहे. 

          पत्रकार हा इतके दिवस फक्त ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ म्हणून मिरवत होता पण या स्तंभाला स्वतःचा काहीच पाया नव्हता.लोकशाहीच्या या स्तंभाची इमारत कधी कोसळेल हे खुद्द या स्तंभालाही माहीत नव्हते. ‘कोविड’ महामारीच्या काळात आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांच्या खांद्याला खांदा देवून राज्यातील लहानमोठा पत्रकार धावला, त्यावेळी सर्वच स्तरातून त्याचे कौतुक झाले, त्याला आरोग्य कवच पुरविण्याची घोषणाही झाली… पण याच चौथ्या स्तंभातील काही इमले कोसळले , कोविडने त्यांना कवटाळले तेव्हा आधी त्यांच्या कामाचे कौतुक करणाऱ्यांपैकी ना कुणी त्यांना खांदा द्यायला आले ना घोषणा करणारे कुणी त्यांच्या कुटुंबाची दखल घ्यायला आले.आपण व आपला पत्रकार संघ नेहमीच पत्रकाराच्या पाठीशी राहिला.

         पत्रकार हल्ले, कुटुंबापासून कायमच दूर व आर्थिक स्थैर्य नसलेल्या या घटकाला समाजात फक्त बेगडी प्रतिष्ठा होती. नेहमीची वेगवेगळी आंदोलने, मागण्यांची निवेदने, अधिवेशने व त्यावेळची आश्वासने यांनी थोडीफार आशा वाटायची पण ठोस असे हातात काहीच नव्हते.


 सारथी, राज्य सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे , कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे व सर्वच लहानथोर पत्रकारांच्या सहकार्याने महिनाभराच्या अथक प्रवासाने दीक्षाभूमी ते मंत्रालय हि पत्रकार संवाद यात्रा संपन्न झाली. 

      या पत्रकार संवाद यात्रेची दखल घेवून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महायुती सरकारने राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पत्रकारांसाठी स्वतंत्र “महामंडळ” स्थापन करुन खऱ्या अर्थाने समाजातील या दुर्लक्षित घटकाला न्याय देण्याचे काम केले व आपल्या लढ्याला व संवाद यात्रेला खरे यश आले.

      म्हणूनच ….खरा न्याय मिळालेल्या या सर्व पत्रकार रुपी दुर्लक्षित घटकांचा आपल्या कार्यास सलाम !!

        आपणास महाराष्ट्रभरातील तमाम पत्रकार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दीर्घायुष्य व पुढील संपूर्ण कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा !

   महाराष्ट्रातील तमाम पत्रकार आपल्या ऋणातच राहू इच्छितात तरीही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा अल्पसा प्रयत्न !! करत असल्याचे मत पत्रकार संघाचे राज्यसरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे यांनी बीड येथे आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.

राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांचा तुकाराम पगडी विना स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व खोबरे खारीक याचा हार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबा देशमाने, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी. पत्रकार संघाचे  ब्रँड आंबेसेडर स़ंजय फुलसुंदर. नांदेड जिल्हा निवड समिती जिल्हा अध्यक्ष मोहन पाटील पवार. जिल्हा उपाध्यक्ष सुनील चव्हाण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ लोहा तालुका अध्यक्ष विशाल घंटे उपाध्यक्ष संग्राम चव्हाण सचिव माधव ससाणे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईकवाडी मामा आदि उपस्थित होते.

LightBlog

Pages