टिळकनगर धर्मग्रामात मिशन रविवार साजरा - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

22 October 2024

टिळकनगर धर्मग्रामात मिशन रविवार साजरा

 


"मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी आलो आहे - प्रभू येशू ख्रिस्त

 

श्रीरामपूर / प्रतिनिधी:

काल रविवार दि.२० ऑक्टोबर संपूर्ण जगात देऊळमाता मिशन रविवार (मिशन संडे) साजरा करण्यात आला.

"मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी  आलो आहे असे प्रभू येशू ख्रिस्तांने सांगितले प्रमाणे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या समर्पित व त्यागमय जीवनातून दुसऱ्यांची सेवा करण्याची शिकवण दिली आहे. ख्रिस्ताचे हे मिशन कार्य गेली आडीच हजार वर्षापासून अविरत सुरू आहे,अनेक संकटे आली तरी हे कार्य सुरुच आहे, हे मिशन कार्य करीत असतांना अनेक धर्मगुरू,धर्मभगिनी,प्रापचिंक यांनी आपले जीवन ख्रिस्ताठायी समर्पित केले आहे. त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता बाळगणे आवश्यक आहे. हे मिशन कार्य यापुढेही अविरत चालू राहावे यासाठी आपण प्रयत्न करूयात असे फादर म्हणाले.

आजच्या मिशन संडेचे औचित्य साधून टिळकनगर धर्मग्रामातील आगाशेनगर मधील संत झेवियर विभाग (झोन) मधील राजेंद्र भोसले सर,पी.एस. निकम सर व सतिश पाटोळे साहेब यांच्या संकल्पना व योगदानातून आगाशेनगर मधील डि पॉल 

संस्था संचलित ' इप्रेसिया सेवा संदन ' वृद्धाश्रम मधील माता भगिनींना फळे (सफरचंद,केळी) व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

 याप्रसंगी टिळकनगर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरु फा.पीटर डिसोझा,सहाय्यक धर्मगुरू फा.संजय पठारे यांनी विशेष प्रार्थना करून आशिर्वाद दिला. तसेच सर्व वृद्ध महिलांची आस्थाने विचारपूस केली . त्यामुळे या वृद्ध महिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. याप्रसंगी मायकल जगताप हेही प्रामुख्याने उपस्थित होते.

वृत्त विशेष सहयोग

पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 

संकलन

समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११

LightBlog

Pages