श्रीरामपूर / प्रतिनिधी:
स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या माध्यमातून, संगमनेर तालुक्यातील मिरपूर लोहारे येथील पत्रकार रमेश भागवत कापकर संपादित "साई गंगा न्यूज पोर्टल" चे स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या शुभहस्ते काल रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी श्रीरामपूर येथील समता कार्यालयात अनावरण तथा लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ॲड.मोहसिन शेख, पत्रकार अफजल मेमन, हेमंत शेजवळ,कलिम शेख, इब्राहिम बागवान आदि मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार रमेश भागवत कापकर हे साईगंगा या साप्ताहिकाचे संपादक असून स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संगमनेर तालुका समन्वयक आहेत, आपल्या साप्ताहिक साई गंगा या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या संगमनेर तालुक्यासह त्यांनी राहाता, कोपरगांव,राहूरी,सिन्नर, येवला आदी तालुक्यात आपल्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे तथा विविध विषयांकित विशेषांकाद्वारे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, राजकीय , शासकीय, प्रशासकीय यासोबतच धार्मिक आणी पर्यटन, तथा वृक्ष आणी जल संवर्धन, अशा जनहिताच्या विषयांना सातत्याने आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे.
या वर्तमानपत्राने एक पाऊल पुढे टाकत इलेक्ट्रॉनिक मिडियाकडे देखील आगेकूच करत स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित "साई गंगा न्यूज पोर्टल" या नावाने न्यूज पोर्टल सुरु केले आहे. यात देखील विविध विषयांकीत दैनंदिन ताज्या घडामोडींच्या बातम्या असणार आहे.
या साई गंगा या न्यूज पोर्टलसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, कायदेविषयक सल्लागार ॲड.मोहसिन एस.शेख, कार्यकारी संपादक अमोल म्हस्कुले, सहसंपादक संपतराव मैड,उप संपादक हेमंत शेजवळ, मानद संपादक पंढरीनाथ खालकर, व्यवस्थापक - सतिश चिंतामणी तथा संगमनेर तालुक्यासह परिसरातील इतरही तालुक्यातील प्रतिनिधी/ वार्ताहर आदि कामे संभाळत आहेत.
साई गंगा न्यूज पोर्टल सुरु केल्याबद्दल संपादक रमेश कापकर यांचा स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्यावतीने शौकतभाई शेख यांच्या हस्ते समता कार्यालयात सत्कार करण्यात येवून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या