सर सय्यद अहमदखान यांचे शैक्षणिक
कार्य प्रेरणादायी - डॉ.प्रा.सलाम सर
अहमदनगर प्रतिनिधी :
सन १८५७ मध्ये इंग्रजाविरोधात जे बंड पुकारले यामध्ये भारतवासी सहभागी झाले होते. परंतु या बंडाचे खापर इंग्रजांनी मुस्लिमांवर थोपले व मुस्लिमांची संपत्ती, घरे, दुकाने नष्ट केली. त्यांना तोफांनी उडविले, शुळावर लटकाविले, काळ्यापाण्यावर पाठविले, त्यांची मालमत्ता जप्त केली, सरकारी नोकरी देणे बंद केले. फक्त मजुरीचीच कामे देण्यात येवू लागली. इंग्रजांनी फारसी भाषा बंद करुन इंग्रजी भाषाला सरकारी भाषेचे स्थान दिले. पण इंग्रजांच्या अत्याचारित कार्यामुळे मुस्लिम समाजामध्ये इंग्रज व इंग्रजी भाषेविषयी चिड निर्माण झाली व ते इंग्रजी शिकायला तयार नव्हते. इतर समाजाने त्यावेळी इंग्रजी भाषा आत्मसात केली होती. त्यामुळे विकासाच्या मार्गाने ते पुढे गेले. पण मुस्लिम समाज इंग्रजी भाषेस स्वीकारण्यास तयार नव्हता. म्हणून तो सर्वच क्षेत्रात मागे राहिला. अशावेळी सर सय्यद अहेमद खान यांनी समाजाला इंग्रजी शिकण्याचे व शिक्षण घेण्याचे अनुरोध केला. अशावेळी समाजातूनच सर सय्यद अहमद खान यांना विरोध झाला, पण त्यांनी हा विरोध स्विकारुन समाजमन वळविण्याचा प्रयत्न चालूच ठेवला, व त्यासाठी ते सतत झटत राहिले, असे प्रतिपादन डॉ.प्रा.सलाम सर यांनी केले.
मख़दूम सोसायटी, अलफलाह एज्युकेशन एण्ड वेल्फेअर सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्यावतीने स्वातंत्रता सेनानी सर सय्यद अहमदखान यांच्या २०७ व्या जयंतीनिमित्त मातोश्री उर्दू हायस्कूल व अलहाज अब्दुल अजीज ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोहम्मदीया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे प्रमुख कार्यवाह डॉ प्रा. अब्दुस सलाम सर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबिद दूल्हे खान, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सल्लागार शेख शरफुद्दीन सर,मुख्याध्यापक जमीर सर, मुख्याध्यापिका अफसाना बाजी आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात रुक्कैया शेख यांच्या कुराण पठणाने झाली. त्यानंतर हम्द लायबा व नात खुतेजा यांनी तर स्वागत गीत मसीरा व त्याच्या सहकारी यांनी सादर केली.
यावेळी वक्तृत्व स्पर्धेत आमेना जमीर, आमेना शेख, शेख जिया, सय्यद जोया, शेख आलिया, शेख सुहाना, राहीन शकील, माहेनुर शेख, सय्यद सफीना यांनी सहभागी होऊन स्वातंत्र्यसेनानी सर सय्यद अहमदखान यांच्या जीवनातल्या अनेक सामाजिक शैक्षणिक साहित्यिक घडामोडींचा उहापोह केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नसरीन तांबोळी यांनी केले. तर आभार शेख अंजुम यांनी मानले. कार्यक्रमास मखदुम सोसायटी, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद चे पदाधिकारी सदस्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विधार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहयोगी:
पत्रकार आबीद खान, अहमदनगर - 9860477869
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111