दारुल उलूम रज़ाए महेबुब मध्ये मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्न - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

21 October 2023

दारुल उलूम रज़ाए महेबुब मध्ये मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्न




 वेळेत आजाराचे निदान झाल्यास उपचार करणे सोपे होईल- डॉ. शाहीन 


अहमदनगर प्रतिनिधी :

 बदलत्या जीवनशैली आणि वातावरणातील बदलांमुळे मनुष्याची प्रतिकार शक्ती कमी होत आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. दुषित पाणी, फास्ट फुड, अस्वच्छता यामुळे आजारांची उत्पत्ती होतांना दिसते. उपचार वेळेत न झाल्याने आजार बळवतात. वेगवेगळ्या आजारांचे निदानही अत्याधुनिक मशिनीद्वारे करता येत असल्यामुळे उपचार करणेही आता सोपे होत आहे. त्यासाठी अशा मोफत तपासणी शिबीराच्या माध्यमातून आजारांचे निदान वेळेत झाल्यास त्यावर उपचार करणे सोपे होते, असे प्रतिपादन डॉ शाहीन यांनी केले.

हज़रत इमाम हसन  रजि. यांच्या बलिदान दिवसा निमित्त मुकुंदनगर येथील दारुल ऊलुम रजाए महेबुब मध्ये मोफत सर्वरोग निदान उपचार व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये गुडघेदुखी,मानदुखी,पाठदुखी,कंबरदुखी,जोडेदुखी,लहान मुलांचे आजार, त्वचारोग ,केसांचे आजार, डोळ्यांचे आजार आदि विकाराने त्रस्त रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन डॉ.शाहिन मॅडम, 

हाजी समी फारुक शेख, अदनान सर, अफताब अल्ताफ सैय्यद,जाहिद शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ख़ादिम-ए-बारा इमाम कोठला सैय्यद रफाभाई, सामाजिक कार्यकर्ते वाहीद शेख  ,सय्यद साबीर अली, सय्यद गालीब अली , अब्दुल कादिर भाई, शेख राजु भाई, नादीर खान (रुग्ण मित्र),सय्यद आरिफ,डाॅ.सोहेल शेख उपस्थित होते. 

पुढे बोलतांना डॉ. शाहीन म्हणाले की, आज मैदानी खेळ कमी होत चालली आहे व हॉस्पिटलमध्ये गर्दी वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मुलांबरोबरच मोठ्यांमध्येही व्यायाम, खेळ या बाबी कमी होत चालल्या आहेत. म्हणून आजारांशी लढणारी प्रतिकार शक्तीही कमी होत आहे. व त्यामुळे कमी वयात लोकांना हार्ट अ‍ॅटक, शुगर सारखे आजारांना सामोरे जावे लागत आहे. याबाबींकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. मुलांना मैदानी खेळाकडे वळविले पाहिजे, असे केल्यास भविष्यात आजारांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असे सांगितले.

याप्रसंगी दारुल उलूम रज़ा ए महेबूब चे अध्यक्ष शेख बाबर चांद प्रस्ताविक करतांना म्हणाले, प्रत्येकाने आज सामाजिक दायित्व समजून काम केले पाहिजे, याच भावनेतून आपण हजरत इमाम हुसन(रजि.)यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करुन गरजुंना त्यांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी दारुल ऊलुम रजाऐ महेबुब चे अध्यक्ष खलिफा ए मन्सूरे मिल्लत हाजी शेख बाबर चाँद कादरी रज़वी, शेख नदीम, शेख रफिक केडगाव, सय्यद अलीमुद्दीन, शेख तहनूर कादरी, मौलाना शाहीद कादरी रज़वी,सर्व संचालक दारुल ऊलुम रजाए महेबुब यांनी प्रयत्न केले. आभार शेख नदीम यांनी मानले.

सहयोगी:

पत्रकार आबीद खान, अहमदनगर - 9860477869 

संकलन:

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111 




LightBlog

Pages