नेवासा प्रतिनिधी :
पुस्तक वाचनातून ज्ञानरूपी शक्ती प्राप्त होत असते. पैशांपेक्षा विचार महत्वाचे असतात व ते अपनास ग्रंथ वाचनातून सातत्याने प्राप्त होत असतात. विचारांमध्ये जीवन बदलन्याची तागद असून सर्वच ग्रंथ विचारांचे अधिष्ठान असल्याने अबाल - वृद्धांनी पुस्तके वाचली पाहिजेत असे मत माजी कुलगुरु व प्राचार्य डॉ. अशोक ढगे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य शाखा नेवासा आयोजित वाचन प्रेरणा दिना निमीत्ताने "फिरते वाचनालय" या उपक्रमाचे डॉ अशोक ढगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्या प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की पुस्तके वाचल्याने ज्ञानात भर पडून ज्ञानाचा विस्तार होतो . वाचकाची स्मरणशक्ती वाढून मानसिक आरोग्याचे संवंर्धन होते .
शब्दगंधच्या नेवासा शाखेचे अध्यक्ष प्रा .डॉ .किशोर धनवटे यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की वाचनालय आपल्या दारी म्हणजेच "फिरते वाचनालय" नेवासा तालुक्यातील पत्येक गावात वर्षभर फिरत राहणार असून पुन्हा - पुन्हा आपल्या गावात शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्यच्या माध्यामातून येत राहणार आहे, लोकांना मोफत पुस्तके वाचनास देणार असल्याने लोक वाचनास प्रवृत्त हणार आहेत,वाचनाचे महत्व सांगताना डॉ . धनवटे म्हणाले की वाचनाने शब्द संग्रह वाढतो , भाषा कौशल्याचा विकास होतो , सामाजिक भान निर्माण होते, आत्मविश्वास वाढतो . तसेच व्यसनापासून व आत्महत्येपासून परावृत्त करण्याची तागद पुस्तक वाचनात आहे कारण पुस्तकात विचार , व्यक्ति जीवनाचा संघर्ष मांडलेला असतो . ग्रंथ जगभराचे व अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचे साधन असल्याने सर्वांनी सातत्याने ग्रंथ वाचन करण्याचे अवाहन त्यांनी केले .
अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक श्री. हरिभाऊ ढगे हे होते . शेवटी श्री. गणेश ढगे यांनी आभार प्रदर्शित केले.
या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांमध्ये हरिभाऊ ढगे , निवृत्ती ढगे , गणेश ढगे , संदिप ढगे ' हरिभाऊ कोरडे, विकास ढगे , भानुदास पाठे , पोपट माळी , जानेश्वर कोरडे , आण्णासाहेब उदे , अशोक कारभार , रविद्र कोरडे , जानदेव उदे , शिवाजी सिरसाठ , गोविंद कोरडे , मच्छिद्र पवार , शुभम कोरडे , विलास लबडे , राहुल दळवी , अजित ढगे , भाऊराव ढगे , साईनाथ सिरसाठ , कल्याण उदे यांचा समावेश होता.
शेवटी डाॅ.किशोर धनवटे यांनी शब्दगंधच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमास तालुक्यातील नागरिकांनी ग्रंथदान करण्याचे आवाहन केले. यासाठी 9850863509 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन ही केले. शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.
सहयोगी:
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111