अमन सय्यद - बेलापूर :
शारदेय नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगांव येथील न्यू इंग्लिश स्कूल याठिकाणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून युवा व्याख्याते प्रफुल्ल प्रकाश खपके हे उपस्थित होते यावेळी 'हाती ज्यांच्या शून्य होते' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या प्राचार्या प्रा. उन्डें मॅडम यांनी भूषवले, थोरात सर यांनी प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय करून दिला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रफुल्ल खपके यांनी 'हाती ज्यांच्या शून्य होते' या विषयाची मांडणी करताना सामाजिक, आर्थिक, राजकीय, संस्कृतीक क्षेत्रातील शून्यातून विश्व निर्माण केलेल्या आदर्शांचा वस्तू पाठ समोर ठेवला..
विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये कुठलाही न्यूनगंड मनामध्ये न बाळगता आपल्या कलागुणूंना वाव देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे व निवडलेल्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देण्याची भूमिका जागृत केली पाहिजे प्रामाणिकपणाच्या जोरावर प्रचंड इच्छाशक्ती हृदयात घेऊन आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करता येते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी साकारलेल्या हिंदवी स्वराज्यापासून ते देशाच्या स्वातंत्र्यलढ्या पर्यंतच्या प्रत्येक लढाईमध्ये आणि प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तित्वामध्ये या सर्व कलागुणांची आपल्याला प्रचिती झाल्याशिवाय राहत नाही. याच भूमिकेतून आपण सर्व विद्यार्थ्यांनी पेटून उठून स्वप्नांच्या पाठीमागे धावले पाहिजे. अशा अनेक पैलूंवर कार्यक्रमांमध्ये मांडणी झाली.
सरते शेवटी कार्यक्रमाचा समारोप विद्यालयाच्या प्राचार्य प्रा. उंडे मॅडम यांनी विद्यालयाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेल्या व्याख्यात्यांचे त्यांच्यासोबत आलेले सहकारी पत्रकार अमन सय्यद, सर्व उपस्थित विद्यार्थी बंधू-भगिनी व प्राध्यापकांचे तसेच निवेदकांचे आभार मानून केले. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता करून कार्यक्रम संपला.
सहयोगी:
पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111