अजिजभाई शेख / राहाता
राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा व न्यू चांद सुलताना उर्दू हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरीता इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त (जश्न ईद-ए- मिलादुन्नबी) च्या निमित्ताने ह. मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
या वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अत्यंत सुरेख वकृत्व केले व नात ए पाक - मिलाद (धार्मिक कविता) चे वाचन केले.
इ.१ ली ते ४ थी लहान गट, इ.५ वी ते ७ वी मोठा गट व इ. ८ वी ते १० वी हायस्कूल असे तीन गटांमधे ह.मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित वकृत्व आणि नात ए पाक - मिलाद (धार्मिक कविता) वाचन स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या.
त्यात प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक काढण्यात येवून विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व रोख बक्षिसे देण्यात आली.
सदरील ट्रॉफी श्री.श्रीराम विष्णुपंत ताडपत्रीकर यांच्या वतीने देण्यात आली.तर वसीम भाई मन्सूरी यांच्यावतीने रोख रक्कम बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यू चांद सुलताना उर्दू हायस्कूलचे मुख्यध्यापक अतीक कादर शेख हे होते, सुत्र संचालन इलीयास शाह सर यांनी केले.
या प्रसंगी श्री.श्रीराम विष्णुपंत ताडपत्रीकर, श्री.अजय भगत, वसीमभाई मन्सूरी (ग्रा.प.सदस्य भगवतीपूर) राजमोहंमद शेख (संस्थापक अध्यक्ष-कोल्हार एज्युकशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी) जुबेर शेख,पत्रकार शहेबाज पठाण, मुख्तारभाई हकीम,मोहंमद साजिदभाई, तबस्सुम बाजी, नसरीन बाजी, परविन बाजी,इलीयास सर, सिराज सर, न्यू चांद सुलताना उर्दू हायस्कूलचे तबस्सुम बाजी, उर्दु हायस्कूल चे विद्यार्थी, प्राथमिक चे विद्यार्थी व पालक वर्ग यावेळी मोठया संख्येत उपस्थित होते.
१ ली ते ४ थी लहान गट
नात ए पाक मिलाद ( धार्मिक कविता)
१) कु.आलिया मुजफ्फर पठाण -१ ली,
२) मोहम्मद उमर इरफान शेख-३ री,
३) कु.शाफिया युनूस पठाण - ४ थी,
तकरिर( प्रवचन)
१) कु.अनबिया इम्रान शेख - ४ थी,
२) अब्दुल रहेमान जुबर शेख-२ री,
३) सदफ मोहसीन शेख- २ री,
इ. ५ वी ते ७ वी
नात ए पाक मिलाद (धार्मिक कविता)
१) शफीन इब्राहिम पठाण - ७ वी,
२) मदिहा कलीम शेख- ५ वी,
३) नुरमोहम्मद इब्राहिम पठाण - ६ वी,
तकरिर( प्रवचन)
१) कु.आदिबा सईद तांडेल - ६ वी,
२) कु.सदफ अबिद शेख - ७ वी,
३) कु. जैनब मोहसीन शेख - ५ वी,
इ. ८ वी ते १० वी
नात ए पाक मिलाद ( धार्मिक कविता)
१) कु. नुसरत अल्ताफ तांबोळी - १० वी,
२)कु. कशफ अफतार पठाण - ९ वी,
३) कु.फातेमा नसीर शेख - ८ वी,
तकरिर ( प्रवचन)
1) कु.खुषी नासीर शेख - १० वी,
२) कु.जेबा वसीम शेख - ८ वी,
३) कु. अलबिना जाकिर शेख - १० वी,
या विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व रोख रक्कम बक्षीसे देण्यात आली.
सहयोगी:
पत्रकार हाजी राजमोहम्मद शेख - कोल्हार
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111