बी.आर.चेडे - शिरसगांव :
श्री योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या कृपेने ब्रम्हलीन संत सद्गुरू श्री नारायणगिरिजी महाराज यांच्या आशीर्वादाने व अधिपती श्रीक्षेत्र सरला बेट महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने दि २२ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी उत्सव,हवन तसेच गुरुमंत्राचा कार्यक्रम गोदावरी धाम बेट सरला येथे आयोजित करण्यात आला आहे.त्यानिमित्त सकाळी १० ते ११ वा.होमहवन व ११ ते १२ वा.महंत रामगिरी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम यांचे सुश्राव्य प्रवचनाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज भक्त परिवार महाराष्ट्र राज्य संस्था ट्रस्ट गोदावरी धाम बेट सरला,ग्रामस्थ खंडाळा,, कुरणपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111