चाँद सुलताना हायस्कूल व्यवस्थापनाचे वर्षपुर्तीतच विद्यार्थी - शिक्षक व पालकांची अपेक्षापुर्ती - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

19 October 2023

चाँद सुलताना हायस्कूल व्यवस्थापनाचे वर्षपुर्तीतच विद्यार्थी - शिक्षक व पालकांची अपेक्षापुर्ती




 अहमदनगर प्रतिनिधी :

येथील चाँद सुलताना हायस्कूल मधील व्यवस्थापनच्या वर्षपुर्तीनिमित्त कार्याचा आढावा घेतला असता, नूतन समिती विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या अपेक्षापुर्ती करण्यासोबत सर्व आघाड्यांवर यशस्वी ठरल्याचे दिसते. गुणवत्ता दर्जा, शिस्त, मार्गदर्शन आदिंबाबत नूतन समिती कमालीची यशस्वी झाली असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन सय्यद अब्दुल मतीन अ.रहीम यांनी केले. 

कार्यक्रमास जावेद शेख, रफिक मुन्शी, आय.बी.शाह, रफिक शेख, मुस्ताफा खान, हाजी शहेबाज शेख, अल्तमश जरीवाला, अ‍ॅड.अश्रफ शेख आदि मान्यवरांसह संस्थेचे चेअरमन सय्यद मतिन, समद खान, तन्वीर शेख, मौलाना शफीक कासमी, सय्यद असगर, वहाब सय्यद, इसहाक सय्यद, नसिर शेख, खालीद शेख, मन्सूर सय्यद, समीर बेग, सादीक मेंबर, गुलाम दस्तगीर शेख, नवेद शेख, फैय्याज जहागिरदार, जुबेर शेख आदि सर्व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य,  प्राचार्य समी शेख, शफी तांबोळी, नासिर खान, अतिक शेख यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  

पुढे बोलतांना सय्यद मतीन म्हणाले, मागे वळून पाहतांना अनंत अडचणींचा सामना करीत या व्यवस्थापन मंडळाने प्रथमत: शाळेचे इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट केले.  त्याचबरोबर प्रत्येक वर्गात लाईट, फॅन व बेंचेसची व्यवस्था करुन अत्यंत प्रसन्न व अल्हादायक शाळेचा परिसर तयार केला. संपूर्ण इमारत वर्ग खोल्या या सीसीटीव्ही कॅमेरच्या नजरेखाली आणल्या. गतीमान कार्य चे फलित म्हणून शाळेस एक मोठा हॉल देणगीतून सज्ज झाले . त्याचबरोबर काही व्यक्तींनी स्वयंस्फुर्तीने या कार्यात खारीचा वाटा उचलला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून समाजातील सर्वांना शिक्षण,आरोग्य व सर्व सुविधा मिळाव्यात या संदेश देणारा कार्यक्रम सादर केला. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तींना संस्थेच्यावतीने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यात संस्थेची माजी विद्यार्थींनी आयशा शेख यांनी पी.एच.डी. प्राप्त केली. तसेच आदर्श शिक्षक व विविध पुरस्कारप्राप्त शिक्षकांनाही गौरविण्यात आले. यशस्वी वर्षपुर्तीचा आढावा मौलाना शफीक अहेमद कासमी यांनी मांडला. तर संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी नवीन वाटचाली व संकल्प सय्यद वहाब यांनी मनोदयातून व्यक्त केले. 

नवीन व्यवस्थापनाच्या धोरणात्मक निर्णयांमुळे शैक्षणिक दर्जा सुधारल्याचे पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  अहमदनगरचे भुषण सुलतांना चाँदबिबी यांच्या स्मृतीदिनी शौर्यदिन साजरा करुन अहमदनगरचा व चाँदबिबीचा इतिहास भुषण देशमुख यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेत टिकून रहावे, या करीता अंतरराष्ट्रीय दर्जाचे मोटीव्हेशन स्पिकर सईद सय्यद यांचे विद्यार्थी शिक्षक व पालकांकरीता चर्चासत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रेषित मुहम्मद पैंगबर (स.) यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा तसेच विविध वत्कृत्व निबंध, नात अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. संपूर्ण मानव जातीचे प्रेषित मोहंमद (सल्ले.) यांची आदर्श जीवनपद्धती विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी, हा उद्देश या कार्यक्रमातून सफल झाला.

तसेच विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्येही पारितोषिके प्राप्त केली. त्याचबरोबर 10वी व 12 वीचा निकालही 100 टक्के लावून शिक्षक व विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा  कायम राखली. व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याकरीता विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी ‘निर्भय बनो’  व ‘दामिनी पथक’ अभियानांतर्गत कोतवाली पोलिस स्टेशनचे निरीक्षक चंद्रशेखर यादव  व त्यांच्या टीमने मार्गदर्शन केले.  बालभारती उर्दू विभागाचे प्रमुख नवेद खान यांनी पाठ्यपुस्तक निर्मिती व आयुष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. 



शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्न मार्गी लावल्यामुळे  शिक्षक-विद्यार्थी व पालक यांच्या अल्पावधित संस्थेविषयी, व्यवस्थापना विषयी विश्वास निर्माण केला. 

संस्थेला ७० वर्षांची परंपरा असतानाही जास्त विकास होऊ शकला नाही.  असो,या व्यवस्थापन मंडळाने भविष्यात या संस्थेचे स्वत:च्या जागेत एक नवीन शैक्षणिक संकुल उभरण्याचा संकल्प केलेला असून, महाविद्यालय व स्कील डेव्हलमेंटचे कोर्सेस सुरु करुन विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आपला मानस आहे, असा विश्वास व्यवस्थापन मंडळाने व्यक्त केला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तस्लीम शेख व शिरिन खान यांनी केले तर रिजवान सौदागर यांनी आभार मानले.

वृत्तविशेष सहयोग:

पत्रकार आबीद खान,अहमदनगर - 9860477869

संकलन:

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111 




LightBlog

Pages