बेलापुर प्रतिनिधी :
संत लुक हॉस्पिटल श्रीरामपूर, इंडीया बायबल चर्च बेलापूर, फादर हान्स स्टाफनर प्रतिष्ठाण, सेंट अँना फॅमिली, श्रीरामपूर, प्राथमिक आरोग्य केंद्र बेलापूर यांचे संयुक्त विद्यमाने व ग्रामपंचायत बेलापूर बुद्रुक यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी निदान,औषधोपचार, आरोग्यविषयक शिक्षण व जनजागृती आणि आयुष्यमान भारत नोंदणी शिबीर उत्साहात संपन्न झाले.
बेलापुर बु!!राजवाडा येथील इंडीया बायबल चर्च, जूनी शेलार वस्ती या ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात २५० लाभार्थ्यांसह अनेक महिला, पुरुष आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी,बालके यांनी उस्फुर्त सहाभाग नोंदवीला.
सदर शिबिरामध्ये आरोग्य तपासणी, उपचार व औषधे मोफत देण्यात आली. त्याचप्रमाणें सदर शिबिरामध्ये १०२ युनिक हेल्थ आयडी कार्ड, आयुष्मान कार्ड (अर्थात आभा कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर सोबत ) विशेष सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली. सदर शिबिरास जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी यांनी दूरध्वनीव्दारे शुभेच्छा दिल्या. उपसरपंच अभिषेक खंडागळे आणि ग्रामपंचायत सदस्य मुस्ताकभाई शेख यांनी उपस्थित राहुन लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.रमेश धापते, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, श्री प्रशांत गायकवाड , आरोग्य सहाय्यक, श्री. शेख ,श्री. मेश्राम ,श्री.आगलावे आरोग्य सेवक, डाॅ.विवेक राऊत, डाॅ.ललीत सावज, सिस्टर रिटा, सिस्टर लिमा,सिस्टर रोशनी, सिस्टर लिली, सिस्टर एडलीन, सिस्टर जॅकलिन, श्री.विजय त्रिभूवन, श्री.सुरेश कोळगे, श्री. फ्रान्सिस व श्रीमती बोर्जेस, प्रशिक्षक प्रताप भवार, सौ.मंगल दुशिंग यांनी उपस्थित लाभार्थ्यांना सेवा दिली. त्याचप्रमाणे पास्टर कर्डक, तानाजीराव शेलार, सुभाष शेलार, सुधीर तेलोरे, भाऊसाहेब तेलोरे, नितीन तेलोरे, नितीन शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिबीर यशस्वी होण्यासाठी महिला समुपदेशिका सौ. तेरीजाताई तेलोरे, माधुरी शिणगारे, सविता ढाईजे, अंगणवाडी सेविका मंदाताई शेलार, रुथबाई शेलार, आशा सेविका सौ.तेलोरे, सौ. आमोलिक, आशाबाई तेलोरे यांच्यासह महिला भगिनींनी विशेष सहकार्य केले.
सहयोगी:
ज्येष्ठ पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111