राहाता प्रतिनिधी :
तालुक्यातील साकूरी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजूभाई पठाण यांचा (आज दि.१९/१०/२०२३ रोजी) वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे महसूल,पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री.पठाण यांना शुभेच्छा पत्राद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सोबतच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, जि.प.सदस्य नितीनराव कापसे आदिंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच राहाता येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार शाह मुश्ताकअली (मामु) यांनी श्री.पठाण यांचेअभिष्टचिंतन करत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी इरफानभाई शेख,ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाईजेशन राहाता तालुका अध्यक्ष शौकतभाई तांबोळी, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन राहाता शहराध्यक्ष समीरभाई तांबोळी,अकीलभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.पठाण यांचे परिसरात मोठे सामाजिक कार्य असुन पत्रकारीतेत देखील त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे,रांजल्या,गांजल्या उपेक्षित आणी दुर्लक्षीतांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी नेहमी धावून जाण्याची त्यांची कार्यतत्पर्ता ही अनोखी आहे,सर्वांना हवेहवेसे वाटणारे असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व परीसरात सर्वाना मोठे सुपरिचित आहे,करीता सामाजिक,शैक्षणिक,शासकीय, प्रशासकीय, राजकीय आदि क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सहयोगी:
पत्रकार अजिजभाई शेख - राहाता
संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111