बिल्कीसबानो प्रकरणी दोषींची सुटका रद्द होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी ; आदीलभाई मखदूमी - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

25 August 2022

बिल्कीसबानो प्रकरणी दोषींची सुटका रद्द होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी ; आदीलभाई मखदूमी

 




एम.आय.एम.तर्फे श्रीरामपूर शहरात भव्य 
मुक मोर्चाद्वारे ; महसूल प्रशासनाला निवेदन 

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :


बिल्कीसबानो प्रकरणी दोषी आरोपींना सोडून न देता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीकरीता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) चे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष आदिलभाई मखदुमी यांच्या नेतृत्वाखाली शहरातून भव्य असा मुक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते, पदाधिकारी, एकजुटीने सहभागी झाले होते,यावेळी एम.आय. एम. पक्षातर्फे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष आदीलभाई मखदूमी आणी कार्यकर्त्यांद्वारे महसुल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
आदील मखदुमी यांनी दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, सन २००२ मध्ये गुजरात राज्यात भयानक जातीय दंगल घडली व संपुर्ण जगाला हादरुन टाकणारी घटना या दंगलीमध्ये घडली. सुमारे ११ नराधामांनी माणुसकीला काळीमा फासणारे घाणेरडे कृत्य एका निरापराध २२ वर्षीय बिल्कीसबानो यांच्यावर सामुहिक बलात्कार केले. शिवाय त्या ५ महिन्याच्या गर्भवती होत्या व त्यांच्या परिवारातील ३ वर्षाच्या चिमकुलीसह ०७ जणांची हत्या देखील करण्यात आली.हे कृत्य करतांना या नराधामांना माणुसकीची जाग आली नाही. या ११ जणांना मा.न्यायालयाने दोषी ठरवित सन २००८ साली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, परंतू १५ वर्षाच्या शिक्षेनंतर मे. न्यायालय व गुजरात राज्य सरकार यांनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी सदरील दोषी आरोपींना माफी देत त्यांची सुटका केली.या निर्णयामुळे सर्वांच्याच भावना दुखावल्या गेल्याने ए.आय.एम. आय.एम.पक्षाच्या वतीने श्रीरामपूर शहरात भव्य असा मुक मोर्चा काढण्यात आला, त्याद्वारे केंद्र सरकारने बिल्कीसबानो यांना न्याय मिळवून द्यावा व या ११ नराधामांची सुटका रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागचा उद्देश ऐवढा आहे की, बिलकीसबानो या महिलेवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडावी,यापुढे कोणाचीही माता- भगीनी,मुलगी ही बिल्कीसबानो सारख्या प्रसंगाला सामोरे जाऊ नये,कायदा हा सर्वांना सारखा आहे याचा अशा नराधामांना भान झालाच पाहिजे.म्हणून या मुक मोर्चाव्दारे,सदरील ११ दोषींची सुटका झाल्यामुळे आम्ही तीव्र निषेध करतो तसेच या ११ दोषींवर पुन्हा कारवाई होऊन जन्मठेपीची शिक्षा व्हावी किंवा त्यापेक्षा कठोर शिक्षा पुर्वरत करावी व त्वरीत यांची सुटका त्वरीत रद्द करावी,अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मुकमोर्चामध्ये उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष आदिलभाई मखदुमी, उपजिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे, महंमद बाबुभाई शेख (फिटर), श्रीरामपूर तालुकाध्यक्ष रफीक हाजीमियॉ शेख, (भैय्याभाई), जिल्हा सोशल मिडीयाचे अरबाज शेख, श्रीरामपूर शहराध्यक्ष मोसीन सय्यद, श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष आवेज शेख,तालुका संघटक अब्दुल पटेल, सामाजिक कार्याकर्त्या नाजनीन युनुस पठाण, सामाजिक कार्यकर्ते युनुस युसुफ पठाण, महिला शहराध्यक्षा जबीन अब्दुल पटेल, महिला वार्ड अध्यक्षा अफसाना रऊफ पठाण,हिना पठाण, सायरा शेख, रेहाना शेख, रेहाना सय्यद, सायरा पठाण, जमीला शेख, बेबी शेख,अमिना बागवान,बैय्यो आपा, मुन्नी बागवान, मिनाज शाह, शमा सिराज शेख, परवीन अकबर शाह,नसीम सफदर शाह, जुलेखा शेख, हानिफा शेख, तनवीर सय्यद, इम्रान शेख, युनुसभाई शाह,शाकीरभाई पठाण, मुमताज बाजी मन्सुरी, शोएब आतार,तोहिद शेख,लतीफ मामू शेख आणि इतर नागरीक व कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
LightBlog

Pages