*जनसामान्यांच्या हाकेला ओ देणारा खरा* *निर्पेक्ष जनसेवक हाजी मुखतारभाई शाह* - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

30 September 2022

*जनसामान्यांच्या हाकेला ओ देणारा खरा* *निर्पेक्ष जनसेवक हाजी मुखतारभाई शाह*



मा.नगरसेवक हाजी मुखतारभाई शाह 
यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने .......!

*श्रीरामपूर - येथील गरीब नवाज फाऊंडेशन या सर्व धर्मिय सेवाभावी संस्थेचे संस्थापक तथा श्रीरामपूर नगर पालिकेचे माजी नगरसेवक हाजी मुखतारभाई शाह यांचा ( दि.०१/१०/२०२२) आज वाढदिवस आहे, यानिमित्ताने त्यांच्या निर्पेक्ष कार्यांवर टाकलेला दृष्टिक्षेप.........!*

जनसेवक हाजी मुखतारभाई शाह यांनी गरीब नवाज फाऊंडेशनच्या माध्यमातून तथा स्वकर्तृत्वावर आणि आपल्या जीवाला जीव देणाऱ्या सहकारी मित्र कार्यकर्त्यांच्या बळावर आजवर अनेको सामाजाभिमुख उपक्रमे राबवून शहरातील वंचित तथा उपेक्षित घटकांना आधार देण्याचे मोठे कार्य केले आहे व सातत्याने पुढे ते चालुही ठेवले आहेत,मग त्यात सामुदायिक विवाह सोहळा असेल,नेत्र तपासणी,चष्मे वाटप, आरोग्य तपासणी, श्रमकार्ड, शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची जनसामान्यांना माहीती शिबीरे, कव्वाली प्रोग्राम,न्याज (भंडारा) अन्नदान,अशी बोटावर न मोजता यावी अशी किती तरी सामाजाभिमुख उपक्रमांची नांदीच त्यांच्या कार्यातुन दिसून येते,म्हणून हाजी मुखतारभाई शाह यांचे कार्य म्हणजे आजवर कोणाच्याच म्हणावे असे लक्षात आलेले नाही,ते जरी कॉंग्रेस पक्षाचे असले तरी कोणाचाच त्यांना विरोध नाही,याचे कारणही असेच मजेदार आहे की,ते कधीच कोणताही पक्ष भेदभाव करीतच नाही,जो कोणी त्यांच्याकडे येईल तेव्हाच त्याचेच काम होईल,तो ही आपला की परका ?, कोणत्या पक्ष पार्टीचा ? नंतर बघू,करु असे वेळ मारुन नेण्याचे प्रकार याठिकाणी कधीच होत नाही,ते स्वतः नेहमी आपल्या प्रभागात फेरफटका मारुन निदर्शनास येणाऱ्या विविध नागरी समस्यांचे जागेवरच निराकारण करतात, कोणी फोन करुन तक्रार करेल आणि मग त्याचे काम होईल असे याठिकाणी कधीच बघावयास मिळत नाही,मी स्वतः त्यांच्या प्रभागातीलच मतदार आहे,गेली पाच सहा वर्ष ते नगरसेवक असुनही सत्तेत नसताना देखील आपल्या चांगुलपणाच्या बळावर सत्ताधारी मंडळींचा विश्वास संपादन करत नगर पालिकेद्वारे त्यांनी अनेक चांगले कामे करवून घेतली आहे,आणि आता पदावर नसताना देखील प्रभागातील जनसामान्यांच्या नागरी समस्यांप्रश्नी ते कटाक्षाने लक्ष देवूनच असतात, त्यांची ही जनसेवा केवळ त्यांच्या प्रभागापूरती मर्यादित न राहता परिसरातील प्रभागात देखील जेथे काही उणिवा दिसुन येईल तेथे ते प्रत्येक्ष उभे राहुन नगर पालिका कर्मचाऱ्यांद्वारे कामे करुन घेतात, मग तो प्रभाग जरी त्यांचा नसेल तरी शहरातील नागरी समस्यांचे निराकरण करणे केवळ हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो, मग हा विचार त्यांच्या मनात कधीच येत नाही की हा प्रभाग आपला आहे की इतर दुसऱ्या नगरसेवकाचा ?, आणि त्यांच्या प्रभागात आपण का कामे करावी ?,असे त्यांच्याकडून मुळीच होत नाही, म्हणून त्यांची कामे करण्याची कार्यपध्दती आणि जनसेवा ही सगळ्यांपेक्षा वेगळी असल्याने आजवर त्यांची कार्यपद्धती कधीच कोणाच्या लक्षात आलेली नाही,त्यांना याविषयी छेडले असता ते म्हणतात की नगर पालिका ही जनतेच्या सेवासाठी आहे आणि आम्ही जनतेचे सेवक,मग काय फरक पडतो आपला किंवा इतर दुसऱ्या नगर सेवकाचा जरी प्रभाग असला तरी, समस्या तर जनतेचीच आहेना ?, आणि जनतेने आपल्या मतपेटीद्वारे यासाठीच तर आमच्यावर विश्वास प्रकट केलेला असतो,त्या विश्वासाला कदापी तडा जाता कामा नये असे हसतमुखाने ते कित्येकदा बोलुनही दाखवितात,सदासर्वदा सर्वांशी त्यांचे आदर, प्रेम, आपुलकी आणि सन्मानाचे संबंध,कधीच कोणाशी भांडणे- तंटा वैगरे कधीच नाही,जे कामे प्रेमाणे होतात त्यासाठी भांडणे-तंटा कशाला ?,असे ते आवर्जून म्हणतात, म्हणून "जनसामान्यांच्या हाकेला ओ देणारा खरा निर्पेक्ष जनसेवक हाजी मुखतारभाई शाह" अशी त्यांची कार्यशैली आणि ओळख, त्यांच्या अशाच या कार्येशैलीमुळे त्यांच्यावर स्वपक्षाचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्ष आणि सर्व नगरसेवक,नगर पालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि मतदार असे सर्वच नेहमी त्यांच्यावर खुष असतात,आणि म्हणूनचतर श्रीरामपूर शहरातील सर्वाधिक विकासकामे करणारा नगरसेवक अशी त्यांना ख्याती प्राप्त झालेली आहे,शहरातील प्रत्येक नागरीकाला वाटते की हाजी मुखतारभाई शाह सारखे नगरसेवक खरे तर आपल्याही प्रभागास लाभले पाहीजे, याकरीता ते शहराच्या कोणत्याही प्रभागातून नगर पालिका निवडणुकीस उभे राहीले तर विजय हा हमखास त्यांचाच यात तिळमात्र शंका नाही असे अनेको शहरवासीय बोलुन देखील दाखवितात,हे त्यांना मिळालेले जनतेचे प्रेम आणि विश्वास केवळ त्यांच्या कामे करण्याच्या कार्यपद्धतीमुळेच आहे,अशी त्यांची सर्वांना हवेहवेशी वाटणारी कामे आहेत. म्हणून नगरसेवक असावा तर असा असे यानिमित्ताने म्हणावेसे वाटते,असे सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तीमत्व हाजी मुखतारभाई शाह यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या या वाढदिवसप्रित्यर्थ त्यांच्या उदंड आयुष्यासाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा,तथा भावी जिवनातील उत्तम आरोग्यासाठी हार्दिक सदिच्छा. 🌹
*पत्रकार शौकतभाई शेख*
अध्यक्ष: समता फाऊंडेशन, श्रीरामपूर
LightBlog

Pages