युवा नेत्या डॉ . जयश्रीताई थोरात यांच्या बाबतीत बेताल व घाणेरडे वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांच्यावर तातडीने कारवाई करून अटक करण्यात यावी -नासीर शहानवाज शेख - Dainik Samtadoot

Breaking

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

28 October 2024

युवा नेत्या डॉ . जयश्रीताई थोरात यांच्या बाबतीत बेताल व घाणेरडे वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांच्यावर तातडीने कारवाई करून अटक करण्यात यावी -नासीर शहानवाज शेख


 वजीर शेख / पाथर्डी

परवा धांदरफळ ता.संगमनेर येथे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता वसंत देशमुख यांनी काँग्रेस युवा नेत्या डॉक्टर जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांच्यावर अत्यंत खालच्या आणि दर्जाहीन खालच्या पातळीवर बेताल व खूप घाणेरडे असे वक्तव्य केले असून त्या वक्तव्याचा पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व वसंत देशमुख याचा पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला पाथर्डी तालुका पोलीस स्टेशनचे पीआय माननीय संतोषजी मुटकुळे साहेब यांच्याकडे मागणी करण्यात आली की पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर आजचे आज तातडीने गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशा नीच प्रवृत्ती व हीन दर्जाच्या मानसिकतेला आळा घालण्याची अत्यंत गरज असून समाजामध्ये अशा बाबींना थारा मिळता कामा नये. डॉक्टर जयश्री ताई थोरात या अत्यंत उच्चविद्या विभूषित व  असून त्या सामाजिक कार्यामध्ये नेहमी आघाडीवर असतात वैद्यकीय क्षेत्रामध्ये सर्वसामान्यांना गरिबांना दुबळ्यांना नेहमीच त्यांनी मदत केली असून त्यांच्यावर असे हीन दर्जाचे आरोप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले जाणे हहे समाजासाठी हानिकारक असून या  या व्यक्तीला तातडीने अटक करायला करावी अशी आग्रहाची मागणी पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली

यावेळी पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष नासीर शहानवाज शेख,पाथर्डी शहर काँग्रेस अध्यक्ष रवींद्र पालवे,पाथर्डी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल ढाकणे पाथर्डी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश काळोखे , काँग्रेस माहिती तंत्रज्ञान विभाग जिल्हाध्यक्ष आनंद सानप,युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जुनेद पठाण, पाथर्डी तालुका काँग्रेस सरचिटणीस कयूम शेख अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अस्लम सय्यद अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मुन्नाभाई खलिफा, काँग्रेस एस.सी. विभाग तालुका अध्यक्ष गणेश दिनकर,काँग्रेस माहिती तंत्रज्ञान तालुका अध्यक्ष सागर तरटे आदि सह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

संकलन

समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

LightBlog

Pages