कैलास पवार यांना अंतरराष्ट्रीय राष्ट्रपिता महात्मा गांधी पीस फाउंडेशन डॉक्टरेट पदवी - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

22 October 2024

कैलास पवार यांना अंतरराष्ट्रीय राष्ट्रपिता महात्मा गांधी पीस फाउंडेशन डॉक्टरेट पदवी






 

हेमंत शेजवळ/ शिर्डी

पुणे (वाघोली) प्रतिनिधी:

येथील भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक व श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील भूमिपुत्र अध्यक्ष कैलास पवार यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रातील मानत डॉक्टरेट पदवी नुकतीच नई तालीम समिती द्वारा महात्मा गांधी यांचा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातील शांती भवन सभागृहामध्ये बहाल करण्यात आली.

कैलास पवार यांनी भूमी फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने व असंख्य सेवाभावी लोकांना सोबत घेऊन अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्राचा सामाजिक क्षेत्र ग्रामीण भाग विकास विधवा निराधार महिला आभार निराधार मुलं मुली व शेतकरी बांधव यांच्यासाठी सातत्याने अविराज स्वरूपाचे कार्य सुरू आहे या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेत ही पदवी देण्यात आली आहे  ऑकटोबरमध्ये मला ही पदवी मिळाली तसेच २ ऑक्टोबर रोजी सिने दिग्दर्शक अलका कुबल यांच्या प्रेरणातून भूमी फाउंडेशन या संस्थेची स्थापना झाली हा एक आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे असे पवार म्हणाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांच्या पत्नी अनिता कैलास पवार यांनी सांगितले की भूमी फाउंडेशन सामाजिक संस्था संस्थेने आतापर्यंत लोककल्याणकारी विचाराने कार्य केलेले आहे त्याच कार्याचा खऱ्या अर्थाने आजचा हा गौरव आहे यापुढेही देखील तितक्याच मोठ्या ताकदीने सामाजिक क्षेत्रातील कार्याची व्याप्ती , कार्याचा आलेख हा वाढता असेल.या निमित्ताने कैलास पवार यांचे बाहेरच्या देशातून देखील  अभिनंदन केले जात आहे.त्याचबरोबर भूमी फाउंडेशनच्या  निवासी प्रकल्पातील सर्व कॅडेट आणि मित्रपरिवार ,नाते वाईक व भूमी फाउंडेशनचे हितचिंतक या सर्वांच्या वतीने विविध स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.

वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 

संकलन

समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११





LightBlog

Pages