श्रीरामपूर / प्रतिनिधी:
संशोधन ही एक तपश्चर्या आहे. मराठी साहित्य विश्वातील तपस्वी मर्मज्ञ समीक्षक डॉ. र.बा. मंचरकर यांच्यावर पीएच.डी. केल्याचा सार्थ गौरव वाटतो असे मत मनीषा विठठलराव मोकाटे/ पोखरकर यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील मनीषा विठ्ठलराव मोकाटे उर्फ श्रीमती मनीषा जीवन पोखरकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागात झालेल्या विद्या वाचस्पती / पीएच. डी.प्रकट मुलाखत कार्यक्रमात विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख आणि कार्यकमाचे अध्यक्ष डॉ. तुकाराम रोंगटे यांनी मनीषा मोकाटे यांना पीएच.डी पदवी घोषित केल्यावर सत्कार प्रसंगी डॉ. मनीषा मोकाटे बोलत होत्या. छत्रपती संभाजीनगर येथील बहिःस्थ परीक्षक डॉ. दत्तातत्रय डुंबरे यांनी आपल्या अभिप्रायातून प्रबंध लेखनाचे विशेष कौतुक करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही पीएच.डी. मिळविल्याबद्दल मनीषा मोकाटे आणि मार्गदर्शक डॉ. उज्ज्वला भोर यांचे अभिनंदन केले. मनीषा मोकाटे यांनी' समीक्षक डॉ. र. बा. मंचरकर: एक अभ्यास' या विषयावरील प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. सर्व अनुकूल अभिप्राय आणि प्रकट मुलाखत झाल्यावर डॉ. मनीषा मोकाटे यांनी सन्मान सोहळ्यात आभार मानताना त्या बोलत होत्या. यावेळी वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सर्व मान्यवरांचा पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कवयित्री संगीता फासाटे/ कटारे, डॉ. नंदा काळे/ वर्पे तसेच मोकाटे परिवाराने सर्वांचा शाल, बुके, भेटवस्तू देऊन सन्मान केला. त्याप्रसंगी डॉ. मनीषा मोकाटे यांनी मनोगत व्यक्त करीत सर्वांचे आभार मानताना त्या म्हणाल्या, श्रीरामपूर येथील रा.ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयातील मराठी विभागात ०८ वर्षापासून हा अभ्यास करीत होते परंतु पती आजार, त्यांचे निधन, सासूबाई पुष्पाताई पोखरकर यांचे निधन आणि आवाहनात्मक अभ्यास या गदारोळात अनेकांचे सहकार्य लाभले, सासू, सासरे, आई, वडील, परिवार तसेच प्राचार्य, प्राध्यापक, मार्गदर्शक, ग्रंथालय तसेच डॉ. प्रथमा मंचरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. वडील विठ्ठलराव मोकाटे, सासरे दिनकरराव पोखरकर, सासूबाई स्व. पुष्पाताई पोखरकर, दिर अड, दर्शन पोखरकर, भाऊ शेखर मोकाटे व संजय मोकाटे यांचे खूपच प्रोत्साहन, सहकार्य लाभले. माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. बाबुराव उपाध्ये, संशोधन केंद्र समन्वयक डॉ. एकनाथ ढोणे यांनी गुरु आस्था आणि तज्ज्ञ समीक्षक म्हणून डॉ. मंचरकर यांचा सुचविलेला विषय, केलेले सहकार्य मौलिक स्वरूपाचे ठरले. हा अभ्यास करताना मन आणि विचार प्रगल्भ झाले. एका ज्ञानतपस्वी व्यक्तिमत्त्वाचा शोध घेता आला. मुलींना संशोधन करताना अनेक अडचणी येतात पण तितकेच सहकार्याचे हातही पुढे येतात पण संयम आणि विश्वास ठेवून अभ्यास केल्यास नक्की यश मिळते, असे विचार मांडले. यावेळी अनेक तज्ज्ञ मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. वायूज पोखरकर, संगीता फासाटे, डॉ. नंदा काळे यांनी नियोजन केले. पीएच.डी. प्राप्तीबद्दल अनेकांनी डॉ.मनीषा मोकाटे/ पोखरकर यांचे अभिनंदन केले.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११