श्रीरामपूर / प्रतिनिधी:
मानवी जीवनात आरोग्य जपणे गरजेचे झाले असून आजच्या काळात डॉक्टर हे' देवदूत'च असून त्यांचा माऊली वृद्धाश्रम तर्फे झालेला सन्मान योग्यच होय, असे मत ह.भ.प. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांनी व्यक्त केले.
शहरालगत शिरसगांव येथील माऊली वृद्धाश्रम आणि जानकी माऊली निराधार विद्यार्थी आश्रमाच्या वतीने सातवा वर्धापन सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसगी डॉक्टरांचा सन्मान करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. वृद्धाश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून
उपस्थितांचा सत्कार केला.
यावेळी डॉ. कुमार चोथाणी, डॉ. रवींद्र जगधने, डॉ. दिलीप पडघन, डॉ. सौ. सिंधू पडघन, डॉ. भारत गिडवाणी, डॉ.राजेंद्र लोंढे, डॉ. रवींद्र भिटे यांचा ह.भ.प.आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, बुके, पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराचे नियोजन सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे, शिरीष वाघुंडे, सौ. गौरी वाघुंडे, अरुणराव विसपुते, सौ. वंदनाताई विसपुते, डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार राजेंद्र देसाई, संतोष मते, शुभम नामेकर, दत्तात्रय खिलारी, आदिंनी नियोजनात भाग घेतला. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांनी माऊली वृद्धाश्रम हे सेवेचे तीर्थस्थळ आहे. निराधार आजी, आजोबा, विद्यार्थी यांची गेल्या ०७ वर्षापासून मनोभावे सेवाभाव करणारे वाघुंडे परिवार, पदाधिकारी आणि देणगीदार यांचे योगदान आदर्शवत आहे. असे सांगून वृद्धाश्रमासाठी डॉक्टरांचे विनामूल्य कार्य भूषणावह असल्याचे सांगितले.
यावेळी प्राचार्य टी.ई. शेळके, सुखदेव सुकळे, डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ, पत्रकार राजेंद्र देसाई, प्रकाश कुलथे, राजेंद्र बोरसे, नवनाथ कुताळ, महेश माळवे,भानुदास खरात, सुरेश कर्नावट, लक्ष्मीकांत जेजुरकर, ओमप्रकाश बनकर, ह.भ.प. गोरक्षनाथ शिंदे , गोरक्षनाथ अकोलकर, दत्तात्रय परदेशी, श्यामराव नवले, चंद्रकला डोळस, तुकाराम डोळस आदींसह देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अण्णासाहेब भिंगारदिवे, रावसाहेब भिंगारदिवे, अमोल भिंगारदिवे, भास्करराव ताके पाटील, राजेंद्र रासने परिवार यांचा सत्कार करण्यात आला.
संतोष मते यांनी सूत्रसंचालन केले तर सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी आभार मानले.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११