सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांचा फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प : प्राचार्य अरुण तुपविहिरे - Dainik Samtadoot

Breaking

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

30 October 2024

सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांचा फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प : प्राचार्य अरुण तुपविहिरे


फटाके नको आम्हाला, पुस्तक द्या वाचायला



जावेद शेख / राहुरी 

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ, राहुरी येथे दीपावली सुट्टिला जाण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करावे याकरीता फटाकेमुक्त दीपावली साजरीकरण्याचा संकल्प केला यावेळी  सर्व विद्यार्थ्यांनी फटाके न फोडण्याची प्रतिज्ञा घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठ परिसरात फेरी काढून फटाकेविरोधी जनजागृती केली. 'फटाके नको आम्हाला, पुस्तके द्या वाचायला,' अशा घोषणा दिल्या. प्राचार्य अरुण तुपविहीरे यांनी फटाके फोडल्यानंतर बाहेर पडणारे रासायनिक घटक व विषारी वायू व त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगितले. तसेच यामुळे अनेक ठिकाणी आग लागून खूप नुकसान झाले आहे ,फटाके खरेदीऐवजी या

पैशांचा उपयोग विद्यार्थ्यांनी वाचनीय पुस्तके किंवा खेळणी अथवा छंद जोपसण्याकरिता करावा. तसेच आपल्या सभोवतालच्या गरीब व्यक्तींना दीपावलीनिमित्त मदत करून आनंदात सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

या उपक्रमाकरिता एनसीसी अधिकारी संतोष जाधव, घनश्याम सानप,प्रकाश शिंदे, अविनाश यादव ,हलीम शेख, तुकाराम जाधव,संदीप कुंभारे, मल्लीनाथ रेऊरे यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्राचार्य अरुण तुपविहीरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा यांनी सर्व  विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

संकलन

समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११


LightBlog

Pages