ज्ञानाची तहान आणि विचारांनी महान होण्यातच देवत्त्व होय- प्रा. विलासराव तुळे - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

22 October 2024

ज्ञानाची तहान आणि विचारांनी महान होण्यातच देवत्त्व होय- प्रा. विलासराव तुळे

 



श्रीरामपूर / प्रतिनिधी:

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षण आणि नोकरी करताना समाधान लाभले. अशा जीवन वाटचालीत ज्ञानाची तहान आणि विचारांनी महान होण्यात खरे देवत्त्व असल्याचा अनुभव आल्याचे मत रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले प्रा. विलासराव शिवाजी तुळे यांनी व्यक्त केले.

येथील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रा. विलासराव तुळे यांचा वाचन संस्कृती प्रतिष्ठान, श्रीरामपूर, कराड येथील प्रा. भगवान पाटील, प्रा. पोपटराव काटकर, सातारा येथील कर्मवीर भाऊराव विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजयराव कुंभार इत्यादी मान्यवरांनी केलेल्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यानिमित्ताने वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रा. तुळे यांचा सन्मान करून झालेल्या विविध सत्काराबद्दल कौतुक केले. कराड येथील गुरुवर्य प्रा. भगवान पाटील, प्रा. पोपटराव काटकर यांनी तुळे यांच्या कष्टप्रद आणि ज्ञानामय वाटचालीचे कौतुक केले. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजयराव कुंभार म्हणाले, प्रा.तुळे यांनी सातारा येथे शिक्षण घेतले. राहाता,मंचर, कोळपेवाडी, नगर, बोधेगाव,मोखाडा इत्यादी शाखेत प्रामाणिकपणे मराठी विषयाचे अध्यापन केले. त्याविषयी त्यांचा सत्कार म्हणजे रयतनिष्ठ आणि ज्ञाननिष्ठेचा सत्कार होय, असे गौरवोद्गार काढून शाल, बुके,भेटवस्तू देऊन सन्मान केला. याप्रसंगी कुंभार समाज महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सतिशदादा दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत कुंभार, रामदास कुंभार, कुंभ विकास साप्ताहिकचे मुख्य संपादक दिगंबर इंगळे पुणे, लक्ष्मण कुंभार,भाऊसाहेब आवडकर, गजानन कोळमकर, विश्वनाथ कोळमकर, अनिल झोजे पुणतांबा तसेच शिऊर येथील गवळी बंधूसह अखिल भारतीय प्रजापती (कुंभकार) कुंभार संघ पदाधिकारी, गुणवंत मान्यवर सत्कारमूर्ती आणि समाज बांधव उपस्थित होते. प्रा. विलासराव तुळे यांनी काठापूर गावातील शिक्षण आणि शिक्षणासाठी केलेल्या भ्रमंतीच्या आठवणी सांगितल्या. गुरुवर्य प्रा.बी. डी. पाटील, डॉ.बाबुराव उपाध्ये इत्यादीसारखे शिक्षक लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनाला योग्य दिशा मिळाली. श्रीरामपूरला स्थायिक होऊन प्रगती करता आली असे अनुभव सांगून अनेकांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.

वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 

संकलन

समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११

LightBlog

Pages