श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वडाळा महादेव येथे पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बीएड छात्र -अध्यापक व विद्यार्थी यांनी प्रतिज्ञा केली . विद्यालयाचे मुख्याध्यापक माळी साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फटाके फोडल्याने बालमजुरीला प्रोत्साहन, ध्वनि प्रदूषण, जीवघेणे अपघात, वायु प्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास होतो असे प्रतिपादन केले. तसेच बीएड छात्र-अध्यापक गावित सर यांनी विद्यार्थ्यांना फटाके फोडल्यामुळे करोडो रुपयांचा ऱ्हास कसा होतो हे पटवून दिले. फटाके वाजवण्याऐवजी पर्यावरणपूरक दिवाळी आपण कशी साजरी करू शकतो यासाठी विद्यार्थ्यांना माहिती - पत्रिका वाटण्यात आल्या. त्यात नमूद केल्याप्रमाणे फटाक्यांसाठी खर्च होणाऱ्या पैशातून आपण शैक्षणिक साहित्य खरेदी किंवा गरजू लोकांना मदत करू शकतो असे आवाहन करण्यात आले. पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ घेताना विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.बाळासाहेब कसार , सौ.शितल निंभोरे, श्रीम. स्वेजल रसाळ, श्रीम. उषा नाईक, श्री. संतोष नेहूल श्री.भास्कर सदगीर, श्रीम. प्रज्ञा कसार, श्री.अविनाश लाटे, सौ. दिपाली बच्छाव , श्रीम. जिजाबाई थोरात, सौ.जयश्री जगताप, जमदाडे सर ,श्रीम.सुनिता बोरावके, श्री.प्रशांत बांडे, श्री. अशोक पवार ,श्री. संदीप जाधव व श्री भास्कर शिंगटे उपस्थित होते.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११