*माऊली वृद्धाश्रमात आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस साजरा
वडाळा महादेव [ वार्ताहार ] श्रीरामपुर तालुक्यातील नेवासा रोड वरील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी तालुका विधी सेवा समिती व श्रीरामपुर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस या निमित्ताने विवीध आयोजन करण्यात आले होते
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा श्री संजय क कुलकर्णी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधिश १ सत्र न्यायाधीश श्रीरामपुर यांनी भुषविले प्रसंगी श्री कुलकर्णी साहेब यांनी येथील आजी आजोबा तसेच शालेय विद्यार्थी यांच्याशी चर्चा विनीमय करून त्यांच्या व्यथा समजावून घेतल्या तसेच भविष्यात आजी आजोबा यांना न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून तसेच समुपदेशन करून घरवापसी साठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले
यावेळी प्रमुख उपस्थिती श्री एस आर यादव जिल्हा न्यायाधिश - २ अतिरिक्त सत्र न्यायाधिश तसेच श्री साळवे साहेब 3 अतिरिक्त सत्र न्यायाधिश
मा. श्री. आर बी गीरी दिवाणी न्यायाधीश व स्तर मा श्री व्हि बी कांबळे सह दिवाणी न्यायाधिश व वरीष्ठ स्तर व श्रीरामपुर . मा. ॲड श्री व्हि एन ताके अध्यक्ष वकील संघ श्रीरामपूर यावेळी माऊली वृद्धाश्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष वाघुंडे यांनी आजी आजोबा यांच्या विषयी माहिती व्यतीत करत सर्वांच्या सहकार्याने आश्रम सुरू असल्याची माहिती दिली यावेळी सौ कल्पना वाघुंडे श्री दत्तात्रय खिलारी श्री महादू हराड शुभम नामेकर भानुदास खरात पत्रकार राजेन्द्र देसाई तसेच आश्रमीय आजी आजोबा शालेय विद्यार्थी उपस्थित फराळ वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसं चालन ॲड विजय बोर्डे तर आभार अध्यक्ष श्री व्हि एन ताके यांनी मानले