"कष्टाच्या वाटा" ला राष्ट्रीय संत नामदेव बालसाहित्य पुरस्कार - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

26 October 2024

"कष्टाच्या वाटा" ला राष्ट्रीय संत नामदेव बालसाहित्य पुरस्कार


 

पैठण / प्रतिनिधी:


हिंगोली येथील समृध्दी प्रकाशन यांच्यावतीने २०२४ चा अत्यंत सन्मानाचा राष्ट्रीय स्तरावरील पुस्कारासाठी बालभारतीच्या पाठय पुस्तकातील प्रसिध्द कवी तथा लेखक श्री. अय्युब पठाण लोहगांवकर यांचा बालकांसाठी अतिशय दर्जेदार व आशयघन सुसंस्कारीत बालकथा असेलल्या " कष्टाच्या वाटा " बाल कथासंग्रह हा साहित्य क्षेत्रातील बाल साहित्याच्या उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीबद्दल यंदा संत नामदेव राष्ट्रीय बाल साहित्य पुस्कारासाठी अय्युब पठाण यांच्या " कष्टाच्या वाटा " या बाल कथा संग्रहाची पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. असे संयोजक तथा हिंगोली येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. श्रीराम मारोतराव कऱ्हाळे यांनी अय्युब पठाण लोहगावकर यांना निवड पत्राद्वारे कळविले आहे. सदरील पुरस्काराचे दि. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी ऑनलाईन पध्दतीने  मान्यवरांच्या हस्ते हिगोंली येथून वितरण होणार आहे. अय्युब पठाण यांच्या          " कष्टाच्या वाटा " ला हा सलग दहावा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने श्री. पठाण यांचे साहित्य क्षेत्रात अभिनंदन होत आहे.

संकलन

समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११

LightBlog

Pages