वडाळा महादेव प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगांव फाटा येथील पोलीस निवारा कक्ष या ठिकाणी २६/११ मुंबई शहरावर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली तसेच विवीध कार्यक्रम संपन्न, प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन तसेच एक दिवा शहिद जवानासाठी प्रज्वलित केला यानतंर अभिवादन करून प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी जागतिक संविधान दिन तसेच पंधरा वर्षांपूर्वी मुंबई शहरावर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद जवानां प्रति कृतज्ञता व्यक्त केली तसेच सैन्य दलातील जवान पोलीस जवान अहोरात्र जीवाची बाजी लावून देश रक्षण करत असतात म्हणून आपण सर्वजण सुखी असल्याचे प्रतिपादन केले प्रा शंकरराव गागरे डॉ रामकृष्ण जगताप यांनी मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण केली,यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे प्राचार्य डॉ.शंकरराव गागरे, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, सुकदेव सुकळे, संमोहन तज्ञ डॉ. रामकृष्ण जगताप, पो. ना. मच्छिंद्र शेलार, पो.ना. किरण टेकाळे, गृह रक्षक दलाचे राजेंद्र देसाई, सुयोग बुरकुले, निवृत्त पोलीस कर्मचारी शांतवन गायकवाड, श्रीवेद देसाई, श्री. गायकवाड, अशोकनगर येथील रामकुमार बॅन्डचे अध्यक्ष राम गायकवाड,गणेश गायकवाड, आदि यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सूत्रसंचालन राजेंद्र देसाई यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे तसेच पोलीस नाईक मच्छिंद्र शेलार यांनी मानले.
वृत्तविशेष सहयोग
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव*
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*