श्रीरामपूर प्रतिनिधी :
अंधजनाची आधार व जीवनाची मार्गदर्शिका पांढरी काठी बनली आहे.सन 1964 ला संयुक्त राष्ट्रसंघाने 'पांढरी काठी दिन' साजरा करण्याचे जाहीर केले.रस्ता ओलांडतांना रस्त्यावरील खाचखळगे,चढ उतार,विविध प्राणी यांची काठीच्या स्पर्श ज्ञानावर जाणीव व्हावी यासाठी पांढरी काठीचा सदुपयोग केला जात आहे असे प्रतिपादन जागतिक पांढरी काठी दिन निमित्त आयोजित परिसंवाद कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते समाज कल्याण विभाग मूकबधिर विद्यालय वैद्यकीय सामाजिक अधिकारी श्री.संजय साळवे यांनी केले.
रा.ब.ना.बोरावके काॅलेज यांठिकाणी जागतिक पांढरी काठी दिन एक प्रेरणास्थान यां विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सुनिल चोळके होते याप्रसंगी ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या प्रा.सौ.पोखरकर,प्रा.सौ.एस.जी. निमसे,प्रा.सौ.एस.जी.पाटील,प्रा. सौ.ए.एस.जोंधळे,ग्रंथालय विभागाचे प्रा.डॉ.एन.डी. आनंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
साळवे यांनी सविस्तर मार्गदर्शन करताना दिव्यांग कायदा अधिनियम 2016 चे सविस्तर विवेचन करताना दिव्यांग व्यक्तीचे नवीन 21 प्रकार,दिव्यांग व्यक्तीच्या सामाजिक जीवनात येणाऱ्या विविध समस्या यांवर परखड भाष्य केले.आजच्या संगणकीय युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल पुढे झुकलेली आहे आंपण मोबाईल पुढे झुकू नका तर मोबाईलला झुकविण्याचा प्रयत्न करा कारण त्याचे दुष्परिणामही डोळ्यावर जाणवत आहे.यावर्षी जागतिक दृष्टी दिनानिमित्त "आपल्या डोळ्यांवर प्रेम करा" हि संकल्पना जाहीर करण्यात आली आहे. निसर्गातील सौंदर्याचा आस्वाद घेणे अपेक्षित असेल तर डोळे सुरक्षित असणे आवश्यक आहे.शासन व प्रशासनाने पांढरी काठी मध्ये डिजिटल ऑडिओ पध्दत निर्माण करून अंध व्यक्तींना अधिक सुलभता निर्माण करून देण्यात यावी हिच अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ सुनिल चोळके यांनी बोरावके महाविद्यालयात दिव्यांग व्यक्ती करिता देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.अंध प्रवर्गासाठी ऑडिओ फाॅर्म मध्ये पुस्तक सुविधा पुरविण्याची व्यवस्था आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. ए.बी.आनंदकर केले तर आभार सहाय्यक ग्रंथपाल श्री राजेन्द्र शिंदे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती विजया दिवटे व श्री बाळू जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111