अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा :
गरीब, होतकरू, बेरोजगार युवक-युवतींना मोफत प्रशिक्षणातून नोकरी तथा व्यवसायातून अर्थार्जनाचे साधन उपलब्ध करून देण्याची खात्री असलेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ राज्यात ५११ ठिकाणी तर अहमदनगर जिल्ह्यातील २९ ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे एकाचवेळी करण्यात आला.
कार्यक्रमास मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा , मुख्य सचिव मनोज सौनिक हे उपस्थित होते. तर नवनागापूर उद्योजकता कौशल्य विकास केंद्र, नवनागापूर येथे आयोजित कार्यक्रमातून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनिल शिंदे, प्राचार्य श्री जहागीरदार, संस्थाचालक प्राचार्य अंकुश दराडे, कौशल्य व रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री यांचे खासगी सचिव भास्कर देशमुख, रोटरी क्लबचे नितीन थाडे, प्रा.मनिषा जोगदंड दूरदृष्यप्रणालीद्वारे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील २९ केंद्राचा शुभारंभ
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यासह जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील केळी कोतुळ, राजुर, जामखेड तालुक्यातील नान्नज, खर्डा, कर्जत तालुक्यातील कोरेगांव, मिरजगांव, राशीन, कोपरगांव तालुक्यातील शिंगणापूर, संवत्सर, अहमदनगर तालुक्यातील नवनागापुर, नागरदेवळे, नेवासा तालुक्यातील घोडेगांव, सोनई, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर , निघोज, पाथर्डी तालुक्यातील तीसगांव, मिरी, राहाता तालुक्यातील लोणी खुर्द, पुणतांबा, संगमनेर तालुक्यातील साकुर, आश्वी, शेवगांव तालुक्यातील दहीगाव ने, बोधेगांव, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी, बेलवंडी आणि श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर बुद्रुक, निपाणी वडगांव व राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ व वांबोरी या ठिकाणच्या केंद्रांचा दूरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111