श्रीरामपुर प्रतिनिधी :
कर्तव्य बजावत असताना आपल्यासारखे समाजसेवक पाठीशी उभे असल्यावर काम करण्याचा उत्साह निश्चितच वाढतो द्विगुणीत होते त्यामुळे चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा असा विश्वास लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी व्यक्त केला. गळनिंब तालुका श्रीरामपुर येथील स्पंदन फौंउंडेशन व सिद्धेश्वर चहा समितीच्या वतीने उत्कृष्ट सेवेबद्दल लोणी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विद्यापिठ सिनेटचे माजी सदस्य प्रा. डॉक्टर एकनाथ ढोणे हे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई हे होते.
यावेळी शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त मुंजाबा तरुण मिञ मंडळ यांच्या वतीने व संदिप शेरमाळे यांच्या संकलपनेतून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मास्टर धनंजय जादूगार यांचे जादूचे प्रयोग शो आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई, पुणे विद्यापीठ सिनेटचे माजी सदस्य प्रा.डॉ. एकनाथ ढोणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मार्केट कमिटीचे मा. उपसभापती आण्णासाहेब शिंदे, सिध्देश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सुनिल शिंदे, पत्रकार बाळासाहेब वडीतके, सोन्याबापू जाटे,डॉ. सुनिल चिंधे, केरूनाना शिंदे, आण्णासाहेब शेरमाळे, चंद्रकांत वडीतके, सहाय्यक फौजदार लबडे, सिध्देश्वर चहा समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र खेमनर, वृक्षमित्र अजित देठे, कैलास एनोर, संजय वडीतके, गणेश डोमाळे, सचिन चिंधे, महेश चिंधे,संजय वडीतके, गंगाधर भोसले मुंजबा तरुण मिञ मंडळाचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक दत्तात्रय कडनोर यांनी केले सूत्रसंचालन बाबासाहेब शेरमाळे यांनी केले.स्पंदन फौउंडेशनचे संदीप शेरमाळे यांनी आभार प्रदर्शन केले.
सहयोगी
पत्रकार देवीदास देसाई -बेलापूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111