राजेंद्र बनकर / शिर्डी
श्री साईबाबा संस्थान मधील साईआश्रम धर्मशाळा व इतर ठिकाणी ५५० कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे माञ या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन भेटत नाही तसेच आठवडा सुट्टी , पगारवाढ व इतर सुविधा मिळत नाही असा आरोप करत गेटसमोर कर्मचाऱ्यांनी साखळी पद्धतीने ठिय्या आंदोलन केले. पुण्यातील सुमीत कंपनीने या आश्रमातील साफसफाईचे टेंडर घेतले असुन कंपनीकडुन कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याने कर्मचाऱ्याच्या या आंदोलनस्थळी कॉग्रेससचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले , सुरेश आरणे , मनसेचे लक्ष्मण कोतकर ,प्रशांत वाकचौरे आदींनी भेट देत जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही तोपर्यंत आपणही ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याची भूमिका घेतली होती.तर कर्मचारी हे आपल्या कामाचे दाम मागतात त्यामुळे त्यांना ते वेळेतच मिळावे अन्यथा आपण कार्यालयात स्वताला कोंडून घेऊ अशी भूमिका चौगुले यांनी घेतली तर लक्ष्मण कोतकर, सुरेख आरणे यांनी समंधीत कंपनीचे कर्मचाऱ्यांना सहकार्य मिळत नसुन साईआश्रम या ठिकाणी स्वच्छतेसाठी पुरवलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असुन यामुळे या धर्मशाळेत अस्वस्थता पसरली असल्याचे सांगितले. दरम्यान अभय शेळके यांनी आंदोलनकर्त्यांना आपले वेतन होईल माञ संयम धरा असे सांगितले माञ जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका कर्मचारी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आलेल्या कॉग्रेस व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने अखेर यंञणेला जाग येवून या कर्मचाऱ्यांचे सायंकाळी त्यांच्या खात्यावर पगार टाकण्यास सुरवात झाली व हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
यावेळी सामान्य कामगारांचे पगार का थांबवले जातात समंधीत कंपनीचे टेंडर बदलले माञ व्यक्ती तेच आहे ,फरक देताना चुकीचे निकष दिसून येत असुन यानंतर कर्मचाऱ्यावर अन्याय होता कामा नये अन्यथा कायदेशीर मार्गाने लढा दिला जाईल असे सचिन चौगुले यांनी सांगितले आहे. तर यानंतर कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्यास याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे विषय पाठवून समंधीत प्रकरणी आवाज उठवला जाईल याची काळजी घ्यावी असा इशारा मनसेचे प्रशांत वाकचौरे यांनी दिला आहे.
सहयोगी:
पत्रकार अजीजभाई शेख - राहाता
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111