गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा हीच इश्वर सेवा मानून ८० टक्के समाज कार्य आणि २० टक्के अध्यात्मिक कार्य चालते हीच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची खरी ओळख - चंद्रकांतदादा मोरे - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

02 November 2022

गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा हीच इश्वर सेवा मानून ८० टक्के समाज कार्य आणि २० टक्के अध्यात्मिक कार्य चालते हीच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची खरी ओळख - चंद्रकांतदादा मोरे




 भाऊसाहेब वाकचौरे - अकोले 

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून  गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ८० टक्के समाजकार्य व २० टक्के अध्यात्मिक कार्य चालते व तीच खरी आपली ओळख आहे.जनसेवा हिच ईश्वर सेवा मानून जन सेवा अभियान- एक हात मदतीचा हा उपक्रम सर्व केंद्रात राबविला जातो असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर चे गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांनी केले.

 अकोले येथील विठ्ठल लॉन्स येथे तालुक्यातील सर्व केंद्राच्या माध्यमातून  आयोजित केलेल्या सत्संग मेळाव्यात उपस्थित भाविक, नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  

   गुरुपुत्र चंद्रकांत दादा पूढे म्हणाले की, ज्यावेळी दुखीत माणूस भगवंताचा शोध घेतो. त्यावेळी त्यास भगवान वेगवेगळ्या रुपात, स्वरूपात, विविध प्रकारे विश्वात स्थानापन्न झालेला दिसून येत असतो .तो चराचरात भरलेला आहे.माणूस हा ईश्वर व गुरूचा अंश आहे.त्यामुळे स्वामी मार्गातून अनेक दु:खीतांचे दुःख दूर केले जाते.८० टक्के समाजकार्य व २० टक्के आध्यत्मिक कार्य करण्याचे गुरुमाऊली नी सांगितले आहे. या सेवा मार्गातून गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथून अनेक निराधार बालकांना कपडे,जेवण,शालेय साहित्य दिले जाते.तर अनेक निराधार लेकी भगिनींना साडी चोळी, भांडी भेट दिली जाते. सर्वाना मोफत औषधोपचार केले जातात. व हे सर्व समाजाचे ऋण सर्वांच्या दानातून केले जाते.म्हणूनच दान हे सर्वश्रेष्ठ आहे असे त्यांनी मत व्यक्त केले.

       मोरे पुढे म्हणाले की,  अकोले तालुका हा आदिवासी तालुका आहे.आदिवासी म्हटले की,काहींच्या मनात नकारात्मक सूर येतो.मात्र आदिवासी संस्कृती ही खऱ्या अर्थाने इतर समाजाला दिशा देणारी संस्कृती आहे.त्याचे कारण म्हणजे आदिवासी समजामध्ये मुलीचा जन्म झाला की,तिची पूजा केली जाते.मुलाला हुंडा दिला जात नाही तर उलट मुलीला हुंडा देण्याची प्रथा आहे.या समाजात कधीही मुलींवर अत्याचार, अन्याय होत नाही.अशा अत्याचाराची बातमी कधीही वाचण्यात आली नाही.असे मात्र इतर समाजातील उच्चभ्रू, सुशिक्षित लोकांमध्ये होताना दिसत नाही.आज अशा आदिवासींच्या कृतींचे व मानवी मूल्यांचे जतन करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

   अकोले तालुक्यात 22 श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र असून ती संख्या ५१ वर न्यायची आहे.त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. श्री स्वामी सेवा मार्गात अशक्य काही नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे महाराजांचे अभिवचन दुखीत माणसाला बळ देऊन जाते. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या चार भिंतींना मंदिर न म्हणता केंद्र म्हटले जाते कारण हे केंद्र म्हणजे दोन पायांच्या गाड्यांचे रिपेअर करण्याचे गॅरेज आहे. इथे सेवा करणार्यांना सेवेकरी म्हटले जाते. हे सेवेकरी पद अढळ असून ते उच्चत्तम पद आहे.रोज ११ माळी जप व स्वामी चरित्राचे तीन अध्याय वाचन करणारा खरा सेवेकरी आहे. केंद्रात कोणतीही अंधश्रद्धा नाही,कोणताही भेदभाव नाही.सरकारने महिलांना ३३ टक्क्यावरून ५० टक्के आरक्षण दिले मात्र या मार्गात महिलांना १०० टक्के आरक्षण व संरक्षण दिलेले आहे. गुरूंची विचारधारा सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी केंद्र वाढविणे गरजेचे आहे.

    गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांनी या सेवाकेंद्रामार्फत  मानवी कल्याणासाठी १८ विभागाच्या  माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या ग्रामविकास अभियानाची सविस्तर माहिती दिली. त्यात शेती ही विषमुक्त ,सेंद्रिय शेती शेतकऱ्यांनी करावी असा सल्ला दिला.तसेच सर्व गुरुप्रणालीची माहिती देताना श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जन्मापासून ते  स्वयंभू स्वरूप असून त्यांनी शिष्य जंगली महाराज, गजानन महाराज, साईबाबा, शंकर महाराज, गुलाब बाबा घडविले असून ते वेगवेगळ्या ठिकाणी आपले कार्य करीत असल्याची माहिती दिली व त्यानंतर सदगुरु पिठले महाराज, सद्गुरु मोरेदादा आणि आता प.पू.गुरुमाऊली हे स्वामी समर्थ स्वरूपात कार्यरत आहे.

     यावेळी त्यांनी अकोले तालुक्यातील एका शेतमजुराला आलेला अनुभव कथन केला.व गुरुविषयी श्रद्धाआणि विश्वास असेल तर जीवनात काहीही अशक्य नाही असे सांगत जेथे सर्व असमर्थ तेथे श्री स्वामी समर्थ हा संदेश दिला.

 यावेळी  सुंदर व प्रभावीपणे सुत्रसंचालन सौ.तळेकर यांनी केले. शेवटी राष्ट्र गीताने मेळाव्याची सांगता झाली व सर्व उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

तालुक्यातील कोरोना एकल महिलांना साडी चोळी व फराळाचे वाटप तसेच स्नेहालय अहमदनगर येथील अनाथ मुलामुलींना कपडे आणि फराळाचे पदार्थ व शालेय साहित्य वाटप चंद्रकांत दादा मोरे यांच्या हस्ते करून त्यांना दिवाळी भेट देण्यात आली.

  हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संजय हुजबंद व लांडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुकाप्रमुख, केंद्र प्रमुख,विभाग प्रमुख,सर्व २२ सेवा केंद्राचे महिला व पुरुष सेवेकरी यांनी अथक परीश्रम घेतले.


 संगमनेर येथील भजनी मंडळाने स्वामी स्वरांजली या गिताच्या कार्यक्रमाने सर्वाना मंत्रमुग्ध केले.


प्रवेशद्वारावर सौ.प्रज्ञा सापीके यांनी गुरुप्रणाली ची अप्रतिम, सुंदर व डोळ्यांचे पारणे फेडणारी रांगोळी काढली होती,तिचे कौतुक चंद्रकांत दादा यांनी करून धन्यवाद दिले.व सौ प्रज्ञाचा सत्कार केला.


 सत्संग मेळाव्यासाठी रंगमंचावर सूंदर सजावट केली होती.व चंद्रकांत दादा मोरे यांच्या साठी वडाचे झाडाखाली गुरुप्रणाली ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून व्यासपीठ बनवले होते.ते व्यासपीठ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. चंद्रकांत दादांचा आगमनाचा राजमार्ग फुलांनी सुंदर सजवला होता व त्याच्या दुतर्फा महिला सेवेकरी उभ्या राहून त्यांनी हात जोडून चंद्रकांत दादांचे स्वागत केले.


या मेळाव्यासाठी विठ्ठल लॉन्स विनामूल्य दिल्याबद्दल संचालक हेमंत नवले व विलास वैद्य यांचा दादांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

LightBlog

Pages