ट्रॅफिक पोलिसांकडून ई- चलनाद्वारे होणारी लूट थांबण्याकरिता जनहित याचिका दाखल करणार = वाबळे - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

02 November 2022

ट्रॅफिक पोलिसांकडून ई- चलनाद्वारे होणारी लूट थांबण्याकरिता जनहित याचिका दाखल करणार = वाबळे


 


राजेंद्र बनकर शिर्डी:

नाशिक पुणे हायवेवर चंदनापुरी ते घारगांव दरम्यान महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांनी 'ई' चलनाद्वारे मोटार मालकांची होणारी लूट थांबवावी या विरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती राहाता येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाबळे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

मा.जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना पाठविलेल्या निवेदनात वाबळे यांनी म्हटले आहे की,नाशिक - पुणे हायवेवर चंदनापुरी ते घारगांव दरम्यानं महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांनी वेग तपासणी यंत्र बसविलेले आहे. सदर वेग तपासणी यंत्र बसवलेली गाडी रस्त्याच्या कडेला लपवून उभी केलेली असते हे यंत्र मोटार वाहनांचा वेग तपासणी करते व जास्त वेगाने चालणाऱ्या वाहनांना ई- चलनाद्वारे प्रत्येकी २ हजार रुपये दंड भरण्याचा मेसेज येतो व वाहनधारकांच्या मालकाचे बँक खात्यावरून पैसे वजा होतात.

नाशिक - पुणे हायवेवर चंदनापुरी ते डोळासणे,बोटा,घारगांव या रस्त्यावर अतिवेगाने जास्त अपघात घडल्याचे घटना नाही, जर अतिवेगाने वारंवार अपघात होत असेल तर त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असावे.आजच्या धावपळीच्या युगात ७० ते ९० चा मोटार वाहनाचा वेग म्हणजे फार काही नाही,महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांनी सदरच्या ठिकाणी वेग नियंत्रण तपासणी गाडी लावू नये. विनाकारण वाहन मालकांना २ हजार रुपयाचा उदंड भरावा लागतो, वेग नियंत्रणाचे कसलेही फलक रस्त्यावर लावलेले नाहीत. वेग नियंत्रण मशीन पुढे लावल्याची सूचनाफलक ट्रॅफिक पोलिसांनी लावलेला नाही. गुपचूपपणे मोटार मालकांवर दरोडा टाकण्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांचे  मत आहे. या विरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे राहाता येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाबळे यांनी सांगितले. ट्रॅफिक जाम मध्ये तासनतास वेळ वाया जातो तो वेळ कवर करण्यासाठी मोकळ्या रस्त्याच्या ठिकाणी वाहन चालक ती वेळ कवर करण्याचा प्रयत्न करतात, स्वतःच्या जीवाची काळजी प्रत्येकाला असतेच मात्र अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात दंड वसुलीचा प्रकार निंदनीय असल्याचे वाबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. याबाबत त्यांनी मा.जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना  निवेदन दिलेले आहे त्यात वरील प्रमाणे वाहनचालकांची दिवसा ढवळ्या होणाऱ्या लुटीबाबत अनेको प्रश्न उपस्थित केले आहे.

LightBlog

Pages