महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प परराज्यात जाणे हा मोठा अन्याय; हे सरकार बेरोजगांचा रोजगार हिरावत आहे- डॉ. कुचिक - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

02 November 2022

महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प परराज्यात जाणे हा मोठा अन्याय; हे सरकार बेरोजगांचा रोजगार हिरावत आहे- डॉ. कुचिक


 


राजेंद्र बनकर शिर्डी:

 महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प परराज्यात जाणे हा मोठा अन्याय असून हे सरकार बेरोजगारांचा रोजगार हिरवत असल्याची प्रतिक्रिया.शिवसेनेचे उपनेते व भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी व्यक्त केली.                  मंगळवारी डॉ कुचिक हे साई दर्शनासाठी शिर्डी येथे आले असता त्यांचा भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य  सदस्य ज्ञानदेव पवार, कृष्णनंद पांडे शुभम दिघे, दादासाहेब हांबरे , आनिकेत मडगईकर संतोष पारखे , आदीसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी बोलताना डॉ. कुचिक म्हणाले  महाराष्ट्रातुन हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प गुजरात मध्ये जाणे हे महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी अन्याय करणारी बाब आहे.हे सरकार बेरोजगारांचा रोजगार हिरावत असल्यामुळे महाराष्ट्रातील जनता नाराज आहे. शिवसेनेतुन बाहेर पडलेल्यांचा  निर्णय जनतेला पटलेला नसुन आपण उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून एकनिष्ठ राहुन कामगारांच्या हितासाठी काम करत राहणार आहोत.

शिंदे व फडवणीस सरकारच्या काळात टाटा एअरबस,मेडीकल डिवाईस पार्क, बल्क डर्ग पार्क, वेदांता फाॅक्सकाॅन,मरीन अकॅडमी,डायमंड बोर्स, इंटरनॅशनल फाईनेशियल सेंटर सारखे हजारो कोटी रुपयांचे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात होणार होते ते प्रकल्प जर गुजरात राज्यातील विविध शहरांमध्ये जात आहे. योग्य वेळी जनता निवडणुकीच्या मतपेटीद्वारे यांचा हिशोब चुकता करेल अशी  खात्री आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व कामगार हितासाठी आपले काम यापुढील काळात देखील सुरू राहणार आहे.कोण कुठे गेले यांचा विचार न करता पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम यापुढील काळात आणखी जोमाने सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले,यावेळी बोलताना  भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य सदस्य ज्ञानदेव पवार म्हणाले आमचे नेते डॉ.रघुनाथ कुचिक यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेनेच्या माध्यमातून कामगार हितासाठी आपण काम करत राहणार असल्याचे यावेळी सांगितले, या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.

LightBlog

Pages