राजेंद्र बनकर शिर्डी:
निमगाव कोर्हाळे ते साकुरी शिव रस्त्या दरम्यान नगरमनमाड रोड वर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोडी होत असून वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता या ठिकाणी फ्लाय ओव्हर टाकावा या बरोबरच प्रसाद भोजनालयाकडे जाणारा रस्ता भुयारी मार्गे करावा व साई मंदिरात नारळ व फुले नेण्यासाठी परवानगी मिळावी तसेच साईबाबा संस्थान व शिर्डी शहरातील प्रलंबित प्रश्न. मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते सतिश शामलाल गंगवाल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन केली . त्यावेळी त्यांच्या समावेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर उपस्थित होते.
शिर्डी शहरात दैनंदिन होणारी वाहतूक कोंडी परिणामी गर्दीमुळे होणारा साईभक्तांना त्रास साईबाबा संस्थानचे प्रलंबित प्रकल्प, कोरोनामुळे शिर्डीत व्यवसायकांचे झालेले आर्थिक नुकसान,अतिवृष्टीमुळे शिर्डीत व्यवसायिक,शेतकरी व रहिवासी यांच्यावर आलेले आसमानी संकट आशा शिर्डीतील विविध प्रश्न बाबत सतीश गंगवाल यांनी ना. विखे पाटील यांना लक्ष घालण्याची विनंती भेटी दरम्यान केली आहे.तसेच दिपावली निमित्त मिठाई देऊन महसूल मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.
साईबाबा संस्थांच्या माध्यमातून शिर्डी व परिसरातील गावांचा विकास होण्याकरिता साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी माजी जि. प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांची निवड करण्यात यावी असे पंचक्रोशीतील नागरिकांची इच्छा असल्याचे गंगवाल यांनी भेटी दरम्यान सांगितले