श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

02 November 2022

श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था




 शहरातील रस्ते दुरुस्तींची कामे

विनाविलंब सुरु करावेत,लोकसेवा विकास आघाडीचे न.पा. मुख्यधिकाऱ्यांना निवेदन


शौकतभाई शेख श्रीरामपूर

श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागातील दुर्दशा झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे विनाविलंब सुरु करावीत, अशी मागणी माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे व उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांचेकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

लोकसेवा विकास आघाडीचे वतीने युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, शहराध्यक्ष नाना पाटील, संपर्क प्रमुख रोहन डावखर आदींनी दिलेल्या निवेदनात शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यात आले आहे. अनेक प्रभागातील रस्त्यांना खड्डे पडल्याने वाहतूकीस अडथळा येत असून नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे दुर्दशा झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे त्वरीत मंजूर करुन दुरुस्तीची कामे विनाविलंब सुरु करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने शहरात सर्वत्र धुळीची समस्या निर्माण झाली असल्याचे सिद्धार्थ मुरकुटे यांनी म्हटले आहे. सध्या शहरात अशुध्द पाण्याचा पुरवठा होत असुन, सफाईची कामे देखील नियमित होत नाहीत, स्वच्छतागृहांचे नुतनीकरण व नियमित स्वच्छता, जागोजागी साचलेले कचर्‍याचे ढीग, डास निर्जंतुकीकरण औषध फवारणी, रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरे, भूमिगत गटारीचे झाकणाचे ठिकाणी पडलेले खड्डे, साठवण तलावातील घाण व गाळ काढण्याचे काम, घंटागाडीचे नियोजन, वाढलेले गवत, तुंबलेल्या गटारी आदी महत्त्वाच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले.

शहरातील अनेक प्रभागातील रस्त्यांना खड्डे पडल्याने वाहतूकीस अडथळा येत असून नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे दुर्दशा झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे त्वरीत मंजूर करुन दुरुस्तीची कामे विनाविलंब सुरु करावीत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनात दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या रस्त्यांचा उल्लेख असून त्यात संगमनेर रोड नाका ते नेवासा रोड नाका पर्यंत (अंदाजे ४ कि.मी.), सय्यदबाबा दर्गाह ते बोरावके कॉलेज रोड (अंदाजे २ कि.मी.), कर्मवीर चौक ते बोरावके कॉलेज पर्यंतचा रोड (अंदाजे दीड कि.मी.), दशमेश चौक ते कर्मवीर पुतळा रोड (अंदाजे ५०० मिटर), मोरगे वस्ती वरील द्राक्ष मळा ते नॉर्दन ब्रँच मोरगे वस्ती रोड (अंदाजे १ कि.मी.), मोरगे वस्तीवरील कै. मुरलीधर मुळे रोड (अंदाजे दीड कि.मी.), मोरगे वस्तीवरील टॉवर रोड (अंदाजे दीड कि.मी.), मोरगे वस्तीवरील गणपती मंदिर रोड (अंदाजे दीड कि.मी.), मोरगे वस्तीवरील जगताप (चुन्यावाले) यांचे घरापासून ते कुमावत यांच्या घरापर्यंत (अंदाजे १ कि.मी.), मोरगे वस्तीवरील नॉर्दन ब्रँच ते हॉटेल दिऊरा रोड (अंदाजे २ कि.मी.), वलेशा पथ किशोर दुगल यांचे घरापासून ते पंचायत समिती क्वार्टर पर्यंतचा रोड (अंदाजे १ कि.मी.), भगवान महावीर पथ कमान ते स्टेट बँक चौक रोड (अंदाजे १ कि.मी.), स्टेट बँक चौक ते प्रियदर्शनी मंगल कार्यालय रोड (अंदाजे दीड कि.मी.), सिद्धीविनायक हनुमान मंदिर (रेवजी पाटील डावखर चौक) ते डॉ.कापसे हॉस्पीटल रोड (अंदाजे १ कि.मी.), सरस्वती कॉलनी डॉ.कापसे ते देवकर वस्ती रोड (अंदाजे १ कि.मी.), उत्सव मंगल कार्यालय पासून ते रामचंद्रनगर पर्यंतचा रोड (अंदाजे १ कि.मी.), मातोश्री चौक (थत्ते ग्राउंड) पासून ते शिव रोड. (अंदाजे अर्धा कि.मी.), साडेतीन गल्ली अंतर्गत रस्ते (बजरंगनगर), सुभाष कॉलनी साई मंदिर ते जैयस्वाल यांच्या घरापर्यंत रोड. (अंदाजे ८०० मिटर), डॉ.उंडे हॉस्पिटल ते देविदास चव्हाण यांचे घरापर्यंत (प्रसाद कॉकरी) रस्ता. (अंदाजे १ कि.मी.), इरिगेशन कॉलनी हनुमान मंदिर पासून ते दहावा ओटा साई मंदिर पर्यंतचा रोड (अंदाजे ५०० मिटर), सावता रोड ते सेंट्रल गोडावून पर्यंतचा रस्ता. (अंदाजे १ कि.मी.), मेन रोड पासून (काशीविश्वेश्वर रोड) ते स्मशान भूमीपर्यंतचा रोड (अंदाजे दीड कि.मी.), श्री.शामलिंग शिंदे यांच्या घरापासून ते कुदळे यांच्या वस्तीपर्यंतचा रस्ता (अंदाजे १ कि.मी.), कर्मवीर चौक ते सिटी सर्व्हे कार्यालय पर्यंतचा रोड (अंदाजे ७५० मिटर), गोंधवणी रोड न.प.कॉलनी ते म्हसोबा मंदिर पर्यंतचा रोड (अंदाजे ५०० मिटर), वेस्टर्न हाईटस् पासून ते न.प. सेंट्रल गोडावून पर्यंतचा रस्ता (अंदाजे दीड कि.मी.), इंदिरा गांधी मंगल कार्यालय समोरील रस्ता ओपन थिएटर ते न.प.सेंट्रल गोडावून पर्यंतचा रस्ता (अंदाजे ५०० मिटर), परिमल हौसिंग सोसायटी पश्चिमेकडील कोर्टापर्यंतचा रस्ता (अंदाजे १०० मिटर), गोपीनाथनगर (रेल्वे अंडरग्राउंड पुल) ते संजयनगर पर्यंतचा रस्ता (अंदाजे १ कि.मी.), गोपीनाथनगर (रेल्वे अंडरग्राउंड पुल) ते झिरंगे मळा पर्यंतचा रस्ता (अंदाजे २ कि.मी.), सुतगिरणी फाटा ते गोंधवणी गाव पावेतो श्रीरामपूर शहर रिंग रोड (अंदाजे ३ कि.मी.) या रस्त्यांचा समावेश आहे. तसेच गोंधवणीरोडवरील जयभोले चौक (कलगीधर हॉल) ते कॅनल जवळील लबडे यांचा पेट्रोल पंपापर्यंतचा आगदी छोटा मात्र संजयनगर,इदगाह परिसर, फातेमा हौसिंग सोसायटी, मिल्लतनगरकडे घेऊन जाणारा महत्त्वाचा रस्ता गेली अनेको वर्ष दुरुस्त करण्यात आलेलाच नाही,या रस्त्यावर देखील प्रचंड वाहतुक वाढलेली आहे,मात्र अत्यंत छोटा मात्र महत्वाचा असलेला हा रस्ता नेहमीच सर्वांच्या नजरेतून सुटून जातो त्याच्या दुरुस्तीसाठी देखील यावेळी लक्ष देण्यात यावे

आणि सदर नमूद करण्यात आलेल्या सर्वच रस्त्यांची विनाविलंब तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी, मागणी लोकसेवा विकास आघाडीने केली आहे. निवेदन देतेवेळी माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, रमेश सोनवणे, अ‍ॅड्.पृथ्वीराज चव्हाण, प्रमोद करंडे, अनिल कुलकर्णी, विराज आंबेकर, प्रविण फरगडे, नवाब सय्यद, कैलास भागवत, बाळासाहेब गोराणे,अमित कोलते, भाऊसाहेब पवार, शरद वाघ, वैभव सुरडकर, शंकरराव डहाळे, लाला देवी, सुदेश झगडे, नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचे अभियंता ईश्वर कुट्टी, अभियंता राम सरगर, गौरव यादव आदींसह लोकसेवा विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LightBlog

Pages