मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
वितरण व्यवस्थेतील सर्व त्रुटी लवकरच दुर करण्यात येणार असुन संबधीतांना प्रधानमंत्री मोफत धान्य वाटपाचे कमिशन तातडीने देण्याच्या सुचना देण्यात येतील तसेच नवीन फोर जी मशिन देण्यात येणार असल्यामुळे भविष्यात वाटपास अडचणी येणार नसल्याचा विश्वास पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी व्यक्त केला राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या अडचणी संदर्भात पुरवठा विभागाचे प्रधान सचिव मा. विजय वाघमारे यांच्या समवेत आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या वेळी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील म्हणाले की ऐन सणा सुदीच्या काळात राज्यात मशिन बंद पडल्या त्यामुळे धान्य असुनही दुकानदारांना त्याचे वितरण करणे अवघड झाले अनेक जिल्ह्यात वेळेवर धान्य उपलब्ध करुन दिले जात नाही त्यामुळे अनेक धान्य कोठा लँप्स होत आहे तसेच उशिरा धान्य आल्यामुळे ते मंशिनवर वेळेवर न टाकल्यामुळे वाटप करता येत नाही त्यामुळे गोदामातुन गाडी निघताच त्या दुकानाच्या मशिनवर धान्य साठा टाकला जावा तसेच तीन तीन महीने माल उशिरा मिळत असल्यामुळे कार्डधारकांचा रोष ओढवला जातो मोफत व रेग्युलर धान्य एकाच वेळी देण्यात यावे धान्य कोठा नसल्यामुळे लँप्स झालेल्या धान्य वाटपास मुदत वाढ देण्यात यावी कोरोना काळात मृत्यू पावलेल्या दुकानदारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी कमीशन वाढीबाबत कँबिनेट मंत्रीमंडळात चर्चा करण्यात यावी आय एस ओ मानांकनाबाबत सक्ती करण्यात येवु नये उशिरा आनंदाचा शिधा मिळालेल्या जिल्ह्यांना वाटपासाठी मुदतवाढ देण्यात यावी दुकानदारांना गँस सिलेंडर वाटपास अनुमती देण्यात यावी अशा मागण्या फेडरेशनच्या वतीने मांडण्यात आल्या .त्या वेळी प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी दुकानदारांच्या सर्व अडचणी माननीय पुरवठा मंत्री महोदयांच्या बैठकीत ठेवुन त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करु असे अश्वासन दिले या बैठकीला पुरवठा विभागाचे उपसचिव नेत्रा मानकामे, उपसचिव गजानन देशमुख , अवर सचिव कोळेकर,दिपक आत्राम, सागर कारंडे यांच्या समवेत .ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर फेडरेशनचे राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील ,नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे जनरल सेक्रेटरी बाबुराव ममाणे ,विभागीय अध्यक्ष अशोक ऐडके शांताराम पाटील शंकर सुरोसे ,विवेक भेरे ,दिलीप नवले फारुख शेख सातारा जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब तोडकरी आण्णा शेटे आदि उपस्थित होते.