ऊसाला रास्तभाव मिळणेकामी आपल्या हक्कांसाठी राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी,कोल्हापूर प्रमाणे लढा उभारणे गरजेचे - राजू शेट्टी - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

02 November 2022

ऊसाला रास्तभाव मिळणेकामी आपल्या हक्कांसाठी राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी,कोल्हापूर प्रमाणे लढा उभारणे गरजेचे - राजू शेट्टी


 


जावेद शेख राहुरी:

 महाराष्ट्राच्या साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काट्यामध्ये व रिकव्हरी मध्ये लुटल्याने शेतकऱ्याच्या ऊसाला योग्य तो दर मिळत नाही मात्र आता ही व्यवस्था बदलण्यासाठी व्यवस्थेच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उभे राहून लढा उभा केला तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळू शकेल म्हणूनच या लुटारूंच्या विरोधामध्ये साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे सात नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा काढून सरकारला जाग आणण्याचे काम केले जाणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

       राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीतज्ञ ऍड. रावसाहेब करपे हे होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, प्राध्यापक संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, पक्षाचे प्रवक्ते अनंत निकम आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले की, ऊस आंदोलनाची खरी सुरुवात अहमदनगर जिल्ह्यापासूनच झालेली आहे मात्र आता या जिल्ह्याचे वातावरण बदलत आहे ज्या जिल्ह्यांमध्ये उसाला जास्त दर मिळत होता तेथेच आता ऊस उत्पादकांच्या उसाला कमी दर मिळत आहे हे दुर्दैव आहे. कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी जागरूक झाल्याने या अगदी तीन रुपये जरी कमी मिळाले तरी या जिल्ह्यातील ऊस उत्पादक आंदोलनासाठी तयार असतात ही जागरूकता आता सर्व शेतकऱ्यांमध्ये होणे गरजेचे आहे. तुम्ही गप्प राहिले म्हणजे कारखानदारांच्या उधळपट्टीला तुम्ही मुखसंमती देता असे होते, अनेक ठिकाणी उसाची रिकव्हरी चोरली जाते, इतर ठिकाणी तेरा टक्के रिकव्हरी असतानाच नगर जिल्ह्यामध्ये सरासरी रिकव्हरी अकरा टक्के कशी ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. नगर जिल्ह्याच्या आणि इतर जिल्ह्यांच्या जमिनीमध्ये एवढा फरक आहे का ? असे असेलतर यादी हीच रिकव्हरी कशी योग्य पद्धतीने मिळत होती ? ही रिकव्हरी चोरल्यानेच ऊसाला कमी दर मिळतो व साखर कारखानदार कारखान्यामधून चोरलेल्या रिकव्हरीचे उत्पादित साखर होते, परस्पर विल्हेवाट लावून गब्बर होत आहेत, दहा वर्षांपूर्वी या जिल्ह्यामध्ये ऊसाला २१०० रुपये दर मिळत होता, आजही एकवीसशे रुपये दर मिळतो ही न परवडणारी बाब आहे, सर्व मटेरियल चे तसेच कामगारांचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे हे गणित बसणे शक्य नाही व शेती परवडणारी नाही, कारखानदारांकडून परिसरामध्ये मुबलक ऊस असताना देखील इतर ठिकाणावरून ऊस आणून त्याचा वाहतूक खर्च मात्र आसपासच्या ऊस उत्पादकांच्या माथी मारला जातो आणि त्यामुळेही ऊस दर कमी मिळतो, या वाहतूक खर्चाला देखील आळा लावणे गरजेचे आहे, कोजनरेशन मधून देखील कारखानदारांना पैसा मिळत असतो त्याचबरोबर अल्कोहोल उत्पादन व आता इथेनॉल निर्मितीपासूनही कारखानदारांना पैसा मिळत आहे सर्वसाधारण एक टन ऊस गाळप केल्यानंतर ४३८० रुपये कारखानदाराला मिळतात मात्र शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये २१०० ते २५०० भाव दिला जातो हेच मोठे दुर्दैव आहे, या जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ऊसाचा हा दर सर्वसाधारण मागील गळीताचा २९०० ते ३२०० रुपये मिळणे गरजेचे होते, मात्र तसे घडले नाही, या कारखानदारांना आर्थिक शिस्त लावण्यासाठी आता आंदोलन हाती घेणे गरजेचे आहे व या कारखानदारांवर दहशत निर्माण करणे देखील गरजेचे आहे, या गळीत हंगामामध्ये सुरुवातीलाच कारखानदारांकडून ऊसाच्या दरा संदर्भात वदवून घ्यावे लागेल, व्यवस्थेच्या विरोधात आता लढा उभा करणे गरजेचे आहे, तुम्ही हाक द्या मी तुमच्या मागे हजारो ऊस उत्पादक उभे करतो मात्र तुमची लढाई तुम्हालाच करावी लागणार आहे. किमान वेतनाचा कायदा जसा आहे तसा किमान हमीभाव कायदा संसदेने मंजूर करावा म्हणून मी तो संसदेत मांडला होता मात्र दुर्दैवाने तो मंजूर झाला नाही मात्र येत्या काळात हा कायदा मी नक्कीच मंजूर करून घेईल तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही एफ आर पी कायद्यात देखील दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मागील गळीतातील ऊसाला एफ आर पी अधिक दोनशे रुपये असा भाव दिलाच पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत, त्याचबरोबर या पार्टी अधिक ३५० रुपये अधिक असा ऊसाला दर यावर्षी मिळावा यासाठी देखील आम्ही आग्रही आहोत, अनेक कारखान्यांमध्ये काटा मारला जातो त्यामुळे हे काटे आता साखर आयुक्त कार्यालयाशी ऑनलाईन व्हावेत यासाठी देखील आम्ही शासनाकडे आग्रही आहोत. गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये जवळपास एक कोटी ३२ लाख टन ऊस या कारखानदारांनी ऊस उत्पादकांचा चोरला व त्यातून तब्बल चार हजार सहाशे कोटी रुपयांची साखर या कारखानदारांनी चोरलेली आहे,काटामारीवर नियंत्रण येणे गरजेचे आहे या काटामारीतून जवळपास दहा ते वीस टक्के उसाची चोरी होते. म्हणूनच हे सर्व काटे ऑनलाईन व्हावेत यासाठी आम्ही आग्रही आहोत. याचे नियंत्रण साखर आयुक्तांकडे असणे गरजेचे आहे, हे सहज शक्य होऊ शकते ही मागणी कोणत्याही प्रकारे अवास्तव नाही त्यासाठी ऊस उत्पादकांचा दबाव सरकारवर वाढवावा लागेल सरकार कोणाचेही असो मात्र सत्तेमध्ये साखर कारखानदार असतात त्यामुळे ऊस उत्पादकांचे अनेक प्रश्न भिजत घोंगडे म्हणून पडून राहतात कोणते सरकार शेतकऱ्यांविषयी संवेदनशील नाही,अतिवृष्टीचे पैसे सरकारने या शेतकऱ्यांना तातडीने का दिले नाहीत यापुढे एफ आर पी एकरकमी मिळावी यासाठी देखील आम्ही आग्रही आहोत, शेतकरी एकत्र आला तर या कारखानदारांना पळता भुई कमी होईल या सर्व मागण्या घेऊन आम्ही सात नोव्हेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे भव्य मोर्चा काढणार आहोत या मोर्चाला महाराष्ट्रातील लाखो शेतकरी उपस्थित राहणार आहेत ऊस तोडणी मजुरांची देखील नेमणूक महामंडळाच्या माध्यमातून व्हावी याबाबत देखील आम्ही आग्रही आहोत मुकादम नावाच्या मध्यस्त्याने शेतकरी व मजुरांची लूट सुरू केलेली आहे त्यामुळे आम्ही हा आग्रह शासनाकडे धरलेला आहे. सात तारखेला होणाऱ्या मोर्चासमोर शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातील कारखाने १७ व १८ नोव्हेंबर रोजी बंद ठेवून शासनाच्या मनात भीती निर्माण करून हे सर्व निर्णय घेण्यास आम्ही शासनाला भाग पाडणार आहोत, त्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी यांनी साथ द्यावी असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

        यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी सांगितले की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ३२०० रुपयांच्या खाली आम्ही ऊसाला भाव देऊ दिला नाही कोल्हापूरच्या लढ्याने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राजू शेट्टी यांनी केला, राजू शेट्टी नसते तर आजही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न भिजत पडले असते, अनेक आंदोलनामध्ये रक्त सांडले म्हणून आमच्या भागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना न्याय मिळू शकला, आता संघटित होऊन लढा उभा करणे गरजेचे आहे संघटित झाले तर ऊस दर द्यायला शासनाला व कारखानदारांना भाग पडेल, एक एकर ऊसाला ९० हजार रुपये एवढा खर्च येतो मात्र आजचे गणित बघितले तर ऊसाला देखील एकराला तेवढाच भाव मिळतो त्यामुळे शेती व ऊस उत्पादन ही न परवडणारी गोष्ट झाली आहे, आता संघर्षाला तयार व्हा राजू शेट्टी तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देतील कारखानदारांनी कायद्याच्या बंधनामध्ये शेतकऱ्यांना अडकवले आहे व स्वतःची घरे भरले आहेत त्यांना आता डोळ्यात डोळे घालून उत्तर देण्याची गरज आहे व त्यासाठी संघर्ष गरजेचा आहे.

    यावेळी प्राध्यापक संदीप जगताप कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. रावसाहेब करपे, जिल्हाध्यक्ष रवी मोरे, दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके, दत्तात्रेय आढाव आदींची भाषणे झाली.

      यावेळी अमृत धुमाळ, माजी सरपंच ज्ञानदेव निमसे, मार्केट कमिटीचे संचालक दत्तात्रेय कवाणे, जितेंद्र शिंदे, हमीद पटेल, माजी संचालक सुभाष करपे, राजेंद्र वराळे, मराठा महासंघाचे शिवाजी डौले, पिंटू नाना साळवे, संदीप खुरुद आदींसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश देठे यांनी केले तर आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले.


चौकट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांना शेतकरी संघटनेचा शार्प शूटर म्हणून राजू शेट्टी मानतात जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या मागे उभा राहिला तर या कारखानदारांना नक्कीच झुकण्यास मोरे भाग पडतील मात्र त्यासाठी एक संघपणे मोरे यांच्या मागे उभे राहण्याचे आव्हान यावेळी प्राध्यापक संदीप जगताप यांनी करताच सर्व ऊस उत्पादकांनी एका आवाजामध्ये त्यास संमती दर्शवली.

LightBlog

Pages