श्रीरामपूर तालुका प्रमुखपदी बापूसाहेब शेरकर,तर शहर प्रमुखपदी सुधीर वायखिंडे
श्रीरामपूर (प्रतिनिधी) : बाळासाहेबांची शिवसेना उत्तर नगर जिल्हा कार्यकारणी नुकतीच मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,यांच्या आदेशानुसार खा. सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये जुन्या,नव्या शिवसैनिकांना एकत्र करून एक मजबूत कार्यकारणी जाहीर केली गेली आहे.
यामध्ये श्रीरामपूर शहरातील गेल्या ३० वर्षांपासूनचे जुने आक्रमक शिवसेनेचे पदाधिकारी राहिलेले राजेंद्र देवकर यांची जिल्हा प्रमुखपदी तर, श्रीरामपूर तालुका प्रमुखपदी बापूसाहेब शेरकर आणि शहरप्रमुखपदी सुधीर वायखिडे यांची निवड करून अगामी नगरपालिका जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी ही मोठी जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
राजेंद्र देवकर हे मुळ शिवसेना असल्यापासून सक्रीय सभासद म्हणून काम करत होते, त्यांनी विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ते शिवसेना शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख असे विविध पदाची जबाबदारी चांगल्या पध्दतीने सांभाळली आहे,सध्या राज्यात सुरू असलेले राजकीय समीकरण लक्षात घेऊन त्यांनी मुख्यमंत्री शिदे व खासदार लोखंडे याच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला,त्यांची ओळख ही निष्ठावंत शिवसैनिक असल्याने आणि उत्तम संघटन असल्यानेच त्यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली, त्यांच्या या निवडी मुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे,
बापूसाहेब शेरकर हे देखील भेर्डापूर येथील रहिवाशी असून शेतकरी कुटुंबातील आहे ते देखील मूळ शिवसेनेत अनेक वर्षांपासून विविध पदावर काम करतात म्हणूनच त्यांची निवड झाल्याने ग्रामीण भागातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
सुधीर वायखिडे हे देखील खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब याचे कट्टर समर्थक मानले जातात, त्यांचे वडिल श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राहिलेले आहेत,या सर्व निवडींमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.