अशोकनगर (प्रतिनिधी) : शिरसगांव येथील अशोक कारखान्याचे माजी संचालक गोरक्षनाथ गवारे यांचे नातू युवराज नवनाथ गवारे याची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ४८ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणीच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या महाराष्ट्र प्रातिनिधिक संघाच्या सराव शिबिराकरीता निवड करण्यात आली. त्याच्या सदर निवडीबद्दल अभिनंदन करताना अशोक कारखान्यांचे चेअरमन माजी आमदार श्री.भानुदास मुरकुटे यांच्या समवेत अशोक कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब उंडे, विराज आंबेकर, भरत जगदाळे, सतीश दळे, भाविक गोहील आदी उपस्थित होते.