रमेश जेठे (सर) अहमदनगर:
चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोबतच महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवत करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देत आहेत. यातीलच एक भाग म्हणजे डिप्लोमा, डिग्री व एम बी ए च्याअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता पुणे, रांजणगांव व गुजरात एम आय डी सी मधील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा इंटरव्यू ५ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.
निवड झालेल्या विध्यार्थ्यांना ३.५ ते ६.५ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळणार असून ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी लगेच त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याची माहिती कॅम्पस डायरेक्टर तथा प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील यांनी दिली .
२०११ मध्ये स्थापित अडसुळ शैक्षणिक संकुल याची नेहमीच दर्जेदार शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट व अन्य दर्जाची नोकरी तरुणांना मिळावी या विषयावर भर राहिला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध माणिक आडसूळ यांनी दिली.