वजीर शेख पाथर्डी
पाथर्डी येथील श्री आनंद महाविद्यालय हे सामाजिक उपक्रमामध्ये सदैव अग्रेसर असुन राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून, विविध सामाजिक संस्थांना एकत्रतीत आणत श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी राष्ट्रीय सेवा योजना, शुंभकरोती ऑर्गनायझेशन, शिक्षक मित्र परिवार,वसंतराव नाईक वाचन मंदिर, साई सेवा प्रतिष्ठान, बालानंद परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. शेषराव पवार यांनी शिबीरात सहभागी होणाऱ्या सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा देऊन या शिबीराचे ऊद्घाटन केले. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाने आज एक नवीन सामाजिक उपक्रम पार पडला. निसर्गासारखं निस्वार्थी जगून मानवानेही समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेने पर्यावरणप्रेमी सन्माननीय श्री संदीप राठोड सर, प्रा. सूर्यकांत काळोखे, गणेश कांबळे सर, प्रा. संतराम साबळे, युवराज सर, सचिन चव्हाण सर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. इस्माईल शेख, सर्व बालानंद परिवार, सावरू ग्रुप मधील तसेच इतर ग्रुप मधील कार्यकर्ते, सर्वांनी एक वेगळीच रक्तदानाची चळचळ सुरू करून मानवी जीवनात एक अनोखे संवेदनशीलतेचे, मानवतेचे नाते लक्षात घेऊन, एकत्र येऊन शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. या शिबिरात एकतीस रक्तदात्यांनी ऊत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन शिबीर यशस्वीरित्या पार पाडले. श्री आनंद महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थी इत्यादींनी या शिबीरात रक्तदान केले. प्रोफेसर डॅा. मुक्तार शेख, प्रा. डॉ. संजय नरवडे, प्रा. सुर्यकांत काळोखे, प्रा. डॉ. इस्माईल शेख, प्रा. डॉ. बथुवेल पगारे, प्रा. अनिता पावसे, प्रा. डॉ. अनिल गंभीरे, प्रा. अजिंक्य भोर्डे, प्रा. डॉ. भाऊसाहेब घोरपडे, प्रा. दिनकर जायभाय, प्रा. डॉ. नितिन ढुमणे, प्रा डॅा जयश्री खेडकर इत्यादी सह विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.