रमेश जेठे - अहमदनगर:
येथील प्रसिद्ध लेखिका व कवयित्री सुजाता पुरी यांच्या ऋतू अंतरीचे या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नाशिक येथील साहित्य, कला व व्यक्तित्व विकास मंच आयोजित पहिल्या जागतिक साकव्य संमेलनात थाटात संपन्न झाले.
सुप्रसिद्ध साहित्यिक पांडुरंग कुलकर्णी, बाळासाहेब मगर, अभिनेते दीपक करंजीकर,डॉ. राजेश आहेर,अभिनेते सी.एल. कुलकर्णी, विश्वास कुलकर्णी, सौ.सुमती पवार,संजीव दिघे आदि मान्यवरांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.पुण्याच्या सुप्रसिद्ध स्नेहवर्धन प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. ऋतू अंतरीचे या काव्यसंग्रहामध्ये जीवनाचा वेध घेणाऱ्या अनेक ह्रदयस्पर्शी कविता समाविष्ट असून साहित्य जगतात या काव्यसंग्रहाचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आहे. या काव्य संग्रहासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांची प्रस्तावना लाभली आहे.श्रीमती सुजाता पुरी यांनी आपले लेख व कवितांद्वारे अल्पावधीमध्ये साहित्य क्षेत्रामध्ये आपले नाव उज्वल केले आहे.
राज्यातील विविध कवी संमेलनामध्ये त्यांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत तसेच राज्यातील अनेक साहित्य चळवळीमधून त्यांनी योगदान दिले आहे.वाटेवरच्या मशाली हा त्यांचा लेखसंग्रह ही लवकरच प्रकाशित होणार आहे.ऋतू अंतरीचे हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी सुजाता पुरी यांचे अभिनंदन केले आहे.