तात्काळ कार्येक्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे
बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले !!
वंचित बहुजन आघाडी ही शेवगांव सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार होती परंतु तात्काळ काम सुरू केल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्कार
शौकतभाई शेख श्रीरामपूर:
नुकताच संपलेल्या पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने जागोजागी सस्ते फुटले तर रस्त्याची अक्षरशः चाळण होऊन प्रचंड प्रमाणात खड्डे देखील पडले आहे यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे, रस्त्यावरील खड्डे पडल्याने अनेक ठिकाणी अपघात घडून निर्पराधांना आपला जीव गमवावा लागत आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे, याविषयी बांधकाम खात्याने त्वरित पावले उचलत सदरील रस्त्यांची कामे तात्काळ सुरु करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शेवगांव सा. बां. उपविभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा देत शेवगांव सार्वजनिक बांधकाम विभागास शुक्रवार दि. २८/१०/२०२२ रोजी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले होते, या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेवगांव शहरात येणाऱ्या सर्व खड्डे युक्त रस्त्यांची कामे ३१/१०/२०२२ पासुन सुरु केल्याने वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांकडून शेवगांव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रल्हाद पाठक, होके, सुरेश घुले (तात्या), सचिन देशमुख, संजय डांगे, विजय कर्डीले,लखन घोडेराव, साळवे, गोर्डे आदि अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान पुर्वक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, नितीन मगर,जावेद कामयाब, बरवे मामा, मुंगीचे सामाजिक कार्यकर्ते शेख नबीभाई, शेख राजूभाई, शेख सलीम जिलानी तथा इतर सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रा.किसन चव्हाण म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या लेखी निवेदनाची दखल घेऊन शेवगांव सां.बां.जनतेची कामे करत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करत मानसन्मान करु,मात्र जर निवेदनाची दखल न घेतली गेल्यास त्या नाकर्त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासत त्यांची धिंड काढू हे मात्र निश्चित,कार्यक्षम अधिकारी, कर्मचारी यांचा आम्ही नेहमी आदरच करतो अशीही प्रतिक्रिया प्रा.किसन चव्हाण यांनी याप्रसंगी व्यक्त केली.