जिल्ह्यातील ५३ हजार विद्यार्थी ओबीसी शिष्यवृत्ती पासून वंचित - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

07 November 2022

जिल्ह्यातील ५३ हजार विद्यार्थी ओबीसी शिष्यवृत्ती पासून वंचित




समाज कल्याण शिष्यवृत्ती बाबत विधानसभेत आवाज उठविणार -आमदार कानडे


श्रीरामपूर (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्या निधी अभावी रखडल्या आहेत. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतर मागासवर्गीय शिष्यवृत्ती जिल्ह्यातील ५३ हजार विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षापासून मिळालेली नाही. या शिष्यवृत्तीसह अन्य शिष्यवृत्या बाबत आगामी विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्नद्वारे आवाज उठविण्यात येईल.समाज कल्याण विभागाच्या सर्व शिष्यवृत्या सर्व विद्यार्थ्यांना मिळाल्याच पाहिजेत. याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील जाब विचारला जाईल असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार लहु कानडे यांनी केले.

शिक्षक बँकेचे माजी चेअरमन, शिक्षक नेते सलीमखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघ, गुरुमाऊली मंडळ व परिवर्तन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार कानडे यांची भेट घेऊन समाज कल्याण खात्याच्या प्रलंबित शिष्यवृत्तींसह तालुक्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांवर आमदार कानडे यांचे लक्ष वेधले.त्याप्रसंगी ते बोलत होते.

जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते दहावीत शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतर मागासवर्गीय शिष्यवृत्तीची रक्कम गेली दोन वर्षे मिळालेली नाही. सुमारे आठ कोटी रुपयांची ही प्रलंबित रक्कम वंचित असलेल्या ५३ हजार विद्यार्थ्यांना तातडीने मिळावी या प्रशनी आपण लक्ष घालावे अशी विनंती श्री पठाण यांनी आमदार कानडे यांना केली. त्यांनी तातडीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवढे यांना फोन करून याबाबत माहिती घेतली असता निधी अभावी ही शिष्यवृत्ती योजना रखडल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर त्यांना जाब विचारीत आमदार कानडे यांनी जिल्ह्यातील कोणकोणत्या शिष्यवृत्या प्रलंबित आहेत याची तातडीने माहिती सादर करण्याचे आदेश त्यांना दिले. या प्रश्नी विधानसभेच्या आगामी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधणार आहे असे ही सांगितले.

तालुक्यातील शाळांचे विज बिल न भरले गेल्यामुळे काही ठिकाणी शाळांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहेत.ग्रामपंचायतींनी चौदा व पंधरा वित्त आयोगातून शाळांच्या वीज बिलाची रक्कम भरावी असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेले असताना देखील तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमधून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. विजेअभावी शाळांमधील संगणक व इतर साहित्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहत आहेत तरी शाळांची वीज बिले ग्रामपंचायती मार्फत भरण्यात यावी अशी मागणी यावेळी शिक्षक संघटना प्रतिनिधींनी केली. आमदार कानडे यांनी त्याचवेळी गटशिक्षणाधिकारी श्रीमती सामलेटी यांना फोन करून याबाबत माहिती घेतली व या प्रश्नाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले.

आमदार कानडे यांच्या आमदार निधीतून तालुक्यातील सर्व शाळांना एलएफडी देण्यात आले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना चांगला उपयोग होत आहे. मात्र मर्यादित संख्येमुळे प्रत्येक वर्गात ते उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक वर्गासाठी सेट टॉप बॉक्स उपलब्ध करून दिल्यास वर्गात असणाऱ्या टीव्हीला जोडून त्याचाही उपयोग करता येईल असा प्रस्ताव बँकेचे नूतन संचालक बाळासाहेब सरोदे यांनी मांडला. त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ. एल एफ डी साठी पाच वर्षाचा करार सदर कंपनी सोबत शासनाने केला आहे. नवीन अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर देण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. शिक्षकांनी याबाबत जागृत राहून कंपनीकडे मागणी करावी. काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे आमदार कानडे यांनी यावेळी सांगितले.

तालुक्यातील शालेय ग्रंथालयांना आमदार निधीतून दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सदर मागणी मान्य करण्यात येऊन आगामी काळात तालुक्यातील शाळांना पुस्तके देण्याबाबत निश्चितपणे विचार करू असे आश्वासनही आमदार कानडे यांनी दिले.

 यावेळी तालुक्यातील विविध शैक्षणिक प्रश्नावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलिमखान पठाण,नूतन संचालक बाळासाहेब सरोदे, नूतन विश्वस्त प्रदिप दळवी,संघाचे जिल्हा प्रतिनिधी दीपक शिंदे, संघाचे तालुकाध्यक्ष शकील बागवान,गुरुमाऊली मंडळाचे तालुकाध्यक्ष संतोष वाघमोडे,कार्याध्यक्ष शाम पटारे,सरचिटणीस सुनिल घोगरे,परिवर्तन मंडळाचे जिल्हा नेते सतिश जाधव,राजाबाई कांबळे,केंद्रप्रमुख महादेव गर्जे,कुमार कानडे,कुमार शेवाळे,देविदास कल्हापूरे,ज्ञानदेव जाधव,बाळासाहेब दळवी यांनी सहभाग घेतला.

LightBlog

Pages