शौकतभाई शेख श्रीरामपूर:
" मातृ पितृ देवो भव '' हे पुस्तक तरुण पिढीला प्रेरणा देणारे असल्याचे मत औरंगाबाद येथील प्रा. रेखा वानखेडे यांनी व्यक्त केले. कार्यकमाचे स्वागत व प्रास्तविक आरोग्य मित्र भिमराज बागुल यांनी करून पुस्तकाची माहिती दिली .माझी आई स्व : मिराबाई बागुल व माझे वडील भिमराज बागुल यांनी आम्हा भावडांना सु संस्कृत घडवण्या मधे त्यांचा मोलाचा सहभाग आहे, " मातृ पितृ देवो भव " पुस्तकाचे संपादक डॉ. बाबुराव उपाध्ये हे माझे श्रध्येय आदर्शवत गुरुवर्य आहेत. डॉ.बाबूराव उपाध्ये यांनी वरील पुस्तका बद्दल माहीती देताना असे नमुद केले की सदर पुस्तकातील वीस लेख हे आईवडिलांच्या संस्कारावर आधारीत आहेत .पुस्तकाच्या प्रकाशिका सौं. मोहीनी काळे , सौ. मंदाकिनी उपाध्ये , सौ. निलीमा आंबरे यांचे विशेष आभार.
वरील कार्यक्रमास डॉ. राज वानखेडे , भिमराज बागुल , नितीन बागुल , सृष्टी वानखेडे आदी सहभागी होते. शेवटी आभार सृष्टी वानखेडे यांनी मानले .