विहिरीने गिळंकृत केली सोयाबीन पोते व इतर साहित्य,विहिरीत पडलेली गोमाता सुदैवाने वाचली, शेतकऱ्याचे सुमारे ४ लाखाचे नुकसान - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

02 November 2022

विहिरीने गिळंकृत केली सोयाबीन पोते व इतर साहित्य,विहिरीत पडलेली गोमाता सुदैवाने वाचली, शेतकऱ्याचे सुमारे ४ लाखाचे नुकसान




 राजेंद्र बनकर - शिर्डी: 

काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती म्हणूनच ढासळलेल्या ७० फूट खोल विहिरीत पडलेली गोमाता अडीच तासानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली शेतकऱ्याची ती गाय वाचली खरे पण ७० फूट खोल विहीर ढासळताना व तेथील जमीन खचताना मात्र या विहिरीने शेतकऱ्याची चार लाख रूपयांची  सोयाबीन ,कृषी विषयक औषधे  तसेच एक मोठे आंब्याचे झाड विहिरीने आपल्या पोटात गडप करून घेतली अर्थात गिळंकृत केली आहे गोमातेला वाचविल्याचा आनंद व्यक्त करताना मात्र पाच लाखाचे सोयाबीनला व विहिरीला कायमचे मुकावे लागले आहे ही घटना राहाता शहरातील  गणेशनगर रोड लगत असलेल्या सतिश भोंगळे यांच्या वस्तीवर घडली आहे

             त्याचे असे झाले की शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास प्रगतशील शेतकरी असलेल्या सतिष भोंगळे  यांचे घरालगत खूप जुनी व आतून तीस फूट वीट दगडाचे बांधकाम कठडे असलेल्या ७० फूट खोल विहिरीत काहीतरी धापकन पडल्याचा आवाज झाला लागलीच भोंगळे परिवारातील सदस्य बाहेर आले विहिरीत काही पडले असावे  असता त्यांचे लक्ष विहिरीचे दिशेने गेले तेथे गाय व कंपाऊंड तेथे दिसले नाही त्यानंतर काही क्षणातच लक्षात आले की विहीर ढासळली आहे तारेच्या कुंपणासह गाय विहिरीत पडली गेली अर्धी पाण्यात व अर्धीवर अडकून राहिली ही बाब राहाता नगरपालिकेचे अग्निशमन पथकास कळविण्यात आली त्यानंतर लागलीच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले जेसीबीच्या साह्याने अडीच तास अथक परिश्रम घेऊन नागरिकांच्या मदतीने या पथकाने गोमातेला अडीच तासानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले व जीवदान दिले दरम्यानच्या काळात मात्र विहीर ढासळत व खचत खचत होती विहिरी लगत असलेल्या जुन्या घराची भिंत रात्रीतून ढासाळून विहिरीत पडली त्यापाठोपाठ त्या घरातील  सोयाबीन पोते, कृषी विषयक औषधे  सुद्धा विहिरीत पडून खाली गडप झाली सुदैवाने भोगळे कुटुंब राहत असलेल्या घराला कुठलाही धक्का न पोहोचल्याने अनर्थ टळला परंतु या तीस फुट उंचीचे वीट बांधकामाचे कठडे तसेच तीस फुट उंच आंब्याचे झाड व सोयाबीनची  पोते विहिरीने गडप अर्थात गिळंकृत करून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे

          राहते घराचे भिंतीपासून अवघ्या काही फुटाचे अंतरावर ढासळलेली विहीर असल्याने भोंगळे व बोरावके परिवारास रात्र जागून काढावी लागली ही विहीर आता कायमची बुजवावी लागेल अतिवृष्टीत सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे त्यात कसबस हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनला नुकसान पोहोचू नये म्हणून घरात ठेवले होते पावसाने नुकसान केल्यानंतर जे काही सोयाबीन वाचले होते परंतु  निसर्गाने दिले आणि विहिरीने हिरावून घेतले असाच प्रकार या शेतकऱ्याचे बाबतीत घडले आहे

LightBlog

Pages