शौकतभाई शेख श्रीरामपूर:
रेड क्रॉस सोसायटी ही जागतिक स्तरावर शासनाबरोबर कार्य करणारी संस्था आहे, आरोग्य, महापूर,भूकंप,युद्ध,यासारखी आपत्ती व संकटकाळात नागरिकांना मदत करून त्यांच्या जिवितांचे रक्षण करणे यासह जागतिक शांतता ठेवण्यासाठी रेड क्रॉस चा नेहमीच पुढाकार असतो.
अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर रेड क्रॉस सोसायटी चे कार्य हा सेवेचा आदर्श असल्याचे उदगार बूथ हॉस्पिटल अहमदनगर येथील प्रशासकीय अधिकारी श्री देवदान कळकुंबे यांनी व्यक्त केले
रेड क्रॉस सोसायटी,उपजिल्हा रुग्णालय,नगरपरिषद हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने अहमदनगर येथील बूथ हॉस्पिटल चे सर्व रोग निदान व उपचार शिबिर नुकतेच श्रीरामपूर शहरात संपन्न झाले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात देवदान कळकुंबे बोलत होते
शिबिराचे उद्घाटन रेड क्रॉस अध्यक्ष तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांचे शुभ हस्ते झाले,
अध्यक्षस्थानी सतीश कुंकुलोळ होते.
प्रास्ताविक सचिव सुनील साळवे यांनी केले.
जिल्ह्यातील विविध गावातून आलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली,यावेळी रुग्णांनी संयोजकांचे धन्यवाद मानून समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ.देवदान कळकुंबे, डॉ. ज्योस्ना भराडीया, डॉ.ममता कांबळे, डॉ. स्नेहल शिंदे, डॉ. शहनाज अय्युब, विकी पगारे, विलास वाघमारे, शिबिर प्रमुख जॉन विनोन, आदींनी रुग्णांची तपासणी करून औषोधपचार दिले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अनिल पवार, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव सुनील साळवे, तालुका आरोग्याधिकारी डॉ राजश्री देशमुख, उपजिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश बंड, वैद्यकीय अधिकारी डॉ जया छतवानी, पोपटराव शेळके, प्रवीण साळवे,भरत कुंकुलोल, श्रावण भोसले, विश्वास भोसले, प्रेमनाथ सोनुने, साहेबराव रकटे, प्रकाश मेतकर, संजय दुशिग, सुरेश वाघुले, बदर शेख, अरुण कटारे, विनीत कुंकुलोल, संजय टेकाले, नितीन राऊत, उमेश अग्रवाल, माया चाबुकस्वार, सविता साळुंके आदींनी विशेष परिश्रम घेतले.