कोपरगाव पोलीस अधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई on ऑक्टोबर १४, २०२२ in अहमदनगर - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

16 October 2022

कोपरगाव पोलीस अधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई on ऑक्टोबर १४, २०२२ in अहमदनगर




 कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे पोनि. श्री वासुदेव देसले यांना त्यांचे गोपनी माहितगार मार्फत बातमी मिळाली की, दोन ईस्म हे शिंगणापुर व औद्योगीक वसाहत कोपरागव येथे चोरीची मोसा बुलेट विक्री करण्यासाठी येणार आहे. अशी माहिती मिळाल्याने पोनि. देसले यांनी पोहेकॉ पुंड, पोकों तमनर, पोक शिंदे, पोकों कु-हाडे नेम कोपरगांव शहर पोस्टे यांना सदर बाबत माहिती देवून सापळा रचुन कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर कर्मचारी हे सापळा लावुन कारवाई करत असतांना रात्री 21.00 वा. सुमारास पोलीस ठाणे हद्दीत संवत्सर औदयोगिक वसाहत परिसरात दोन ईसम हे त्यांचे ताब्यात असलेली विना नंबरची बुलेट मो/ सा त्यांच्यासमोरुन संशयीतरित्या पळत घेवुन जाताने दिसल्याने त्यांचा पाटलाग करुन त्यांना पकडुन त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांचे नांव 1. किशोर साहेबराव कापसे वय 21 वर्षे 2. सचिन अंबादास कापसे वय 20 वर्षे दोन्ही रा तागडी ता चांदवड जि नाशिक असे सांगितले. तेव्हा त्यांच्याकडील विना क्रमांकाच्या बुलेट मोटार सायकलच्या कागदपञाबाबत विचार करता त्यांनी मोटार सायकलचे कागदपत्रे न दाखविता उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यांच्याकडे मोसा. चे कागदपत्र नसल्याने त्यांनी सदरची मोसा. कोठुन तरी चोरून आणलेली असल्याची खात्री झाल्याने त्यांच्याकडे अधिक विचारपुस करता त्यांनी त्यांचा तीसरा साथीदार नामे चेतन रमन कापसे वय 19 वर्षे याचे सह वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी केलेल्या खालील मोसा. काढून दिल्या आहेत.

 


सदर आरोपी यांचेकडुन जप्त करण्यात आलेल्या मोसा माध्ये कोपरगाव शहर पोस्टे. येथे दाखल असलेले गुरन. 314/2022 क. 379 भादवि मध्ये चोरी गेलेली बुलेट, गुरनं. 241 / 2022 क. 379 भादवि व गुरनं. 174/2022 क. 379 भादवि मध्ये चोरी गेलेली स्कुटी व बुलेट क्लासिक 350 असे सदर आरोपी यांचे ताब्यातुन जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर श्रीमती भोर मॅडम, उप विभागीय पोलीस अधीकारी शिर्डी श्री संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले पोहेकॉ / ३९९ पुंड, पोकों / ६५२ तमनर, पोको २६२२ शिंदे, पोकों कु-हाडे यांनी केली आहे.

LightBlog

Pages